अष्टपैलू खेळाडू आपल्या संघात असणे नेहमीच फायद्याचे ठरते. जे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतात. ते खेळाडू पर्यायाने टीमसाठी दोन खेळाडूंचे काम करतात आणि एक जागा वाचवतात.
जे फलंदाज थोडीफार गोलंदाजी पण करू शकतात ते कर्णधाराला अजून एक गोलंदाजाचा पर्याय देतात. युवराज सिंग, शोएब मलिक, केदार जाधव, मार्कस लाबुशेन हि यातीलच काही नावे.
इथे आपण अश्या खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी एकाच सामन्यात शकतही ठोकले आणि ४ विकेटही घेतल्या.
१) सचिन तेंडुलकर (१४१ & ४/३८)
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आपण क्रिकेटचा देव म्हणून ओळखतो. १०० शतके करणारा सचिन हा एक चांगला गोलंदाज देखील होता. त्याने १५४ विकेट घेतल्या आहेत ज्यामध्ये ६ वेळा ४ विकेट घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे ज्याने एकाच सामन्यात १०० धावा केल्या आणि ४ विकेटही घेतल्या.
विलीस इंटरनॅशनल कप १९९८ मध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुध्द सचिनने केवळ १२८ चेंडूत १४१ धावांची तुफानी खेळी केली होती ज्यात १३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
प्रथम फलंदाजी करताना भारताने सचिनच्या १४१ आणि अजय जडेजाच्या ७१ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया समोर ३०८ धावांचे लक्ष्य उभारले.
या लक्ष्याचा सामना करताना ऑस्ट्रेलियाने झोकात सुरवात करून सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. पण तेंडुलकरने गोलंदाजीला आल्यावर पटकन स्टीव वॉची विकेट घेतली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताने हा सामना ४४ धावांनी जिंकला. यात सचिनने केवळ ३८ धावांत ४.१५ च्या सरासरीने ४ विकेट घेतल्या.
२) सौरव गांगुली (१३० & ४/२१)
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा उत्कृष्ट फलंदाजाबरोबरच एक चांगला गोलंदाजही होता. अनेकदा तो वनडे मध्ये त्याची १० षटकेही पूर्ण टाकत असे. त्याने एकूण १०० विकेट्स घेतल्या आहेत ज्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी हि केवळ १६ धावांत ५ विकेट घेतल्या आहेत.
श्रीलंकेविरूद १९९९ मध्ये सौरव गांगुलीने एकाच सामन्यात शतक झळकवण्याची आणि ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी साठी पाचारण केले. ज्याचा द्रविड आणि गांगुलीने पुरेपूर फायदा उठवला. दोघांनी मिळून २३३६ धावांची भागीदारी केली, ज्यात गांगुलीने १३० चेंडूत १६० धावा केल्या तर द्रविडने ११८ चेंडूत ११६ धावा काढल्या. या जोरावर भारताने ४ विकेट गमावून २८७ धावा केल्या.
२८८ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने आश्वासक सुरुवात केली होती पण गांगुली गोलंदाजी करायला आल्यावर चित्रच बदलले. त्याने श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगाची विकेट गांगुलीने घेतली आणि श्रीलंकेची दाणादाण उडाली. भारताने हा सामना ८० धावांनी जिंकला.
गांगुलीने ४ षटकात २१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या आणि सामनावीराचा किताब पटकावला.
३) युवराज सिंग (११८ & ४/२८)
२०११ च्या क्रिकेट वर्ल्ड कपचा युवराज सिंग हा मालिकावीर होता. भारतात सामने खेळत असताना माजी कर्णधार एम एस धोनी त्याचा गोलंदाज म्हणून चांगल्या प्रकारे वापर करत होता. २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ५व्या गोलंदाजाची भूमिका बजावली आणि वेळोवेळी विकेटही घेतल्या. त्याच्या नावावर एकूण १११ वनडे विकेट्स आहेत ज्यात ३ वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने बजावलेली आहे.
२००८ मध्ये इंदूरमध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने १२२ चेंडूत ११८ धावांची खेळी केली, ज्यात १५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने जिंकण्यासाठी इंग्लंडला २९३ धावांचे लक्ष दिले.
या धावांचा बचाव करताना हरभजनच्या आधी युवराजने गोलंदाजी करत उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचणीत आणले. याचा मोठाच फायदा होऊन युवराजने मॅट प्रायर, ओवेस शाह, आंड्र्यू फ्लींटॉफ आणि केविन पिटरसनची विकेट घेत इंग्लंडची मधली फळी कापून काढली.
युवराजने १० षटकात २.८ च्या सरासरीने २८ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या. यामुळे भारताने इंग्लंडवर ५४ धावांनी आरामात विजय मिळवला.
ट्रेंडिंग घडामोडी-
म्हणून तब्बल १ वर्ष सचिन समोर जेवण करत नव्हता हा भारतीय क्रिकेटपटू
आता जर टीम इंडिया मागे हटली तर कसोटी क्रिकेट संपून जाईल
न्यूझीलंडला विश्वचषक फायनलमध्ये पोहचविणारा ‘खेळाडू’ शोधतोय…