क्रिकेटमधील टी-20 हा प्रकार मुख्यतः धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. पंरतु या प्रकारात गोलंदाज सुद्धा महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. जर एखाद्या संघाकडे दिलेल्या आव्हानाचा बचाव करण्यासाठी चांगले गोलंदाज नसतील, तर त्या संघासाठी फलंदाजांनी कितीही मोठे आव्हान उभे केले असले तरी त्याचा फायदा होणार नाही. जेव्हा एखादी विकेट जाते, तेव्हा धावांची गती कमी होते. त्यामुळे कित्येक सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीने टी-20 मालिका जिंकल्या आहेत. यामुळे क्रिकेटमध्ये फलंदाजांप्रमाणे गोलंदाजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडे टी-20 क्रिकेटसाठी चांगले गोलंदाज आहेत. दोन्ही संघातील गोलंदाजांना टी-20 क्रिकेटबद्दल खूप अनुभव आहे. भारतीय संघाने यंदा आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांना भारतीय संघात संधी दिली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजापुढे कशी कामगिरी करतात बघावे लागेल. त्यामुळे आपण या लेखामधून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी-20 मालिकेत सर्वात जास्त विकेट घेणार्या तीन गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
3. कृणाल पंड्या, 5 विकेट्स, (2018-19)
आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणारा मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2018-19
मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली होती. पंड्याने या मालिकेत 3 सामन्यात 12 षटके गोलंदाजी करून 5 बळी घेतले होते. त्याबरोबर गोलंदाजी करताना 9 पेक्षा जास्त इकॉनॉमीने धावा दिल्या होत्या. त्याची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी ही 36 धावात 4 विकेट आहे. मात्र, सध्या पंड्या भारतीय संघातून बाहेर आहे.
2. रवींद्र जडेजा, 5 विकेट्स, (2015-16)
सन 2015-16 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत भारताने विजय मिळवला होता. या विजयात रवींद्र जडेजाने मोलाची कामगिरी बजावली होती. जडेजाने ऐन मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या होत्या. जडेजाने त्या मालिकेतील 3 सामन्यात 12 षटके गोलंदाजी करताना 94 धावा देवून 5 विकेट आपल्या नावावर केल्या. जडेजाचे गोलंदाजीतील सर्वोत्तम प्रदर्शन 21 धावात 2 विकेट्स होते. जडेजाने या मालिकेत 8 पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या होत्या.
1. जसप्रीत बुमराह, 6 विकेट्स, (2015-16)
सन 2015 च्या आयपीएल स्पर्धेत सर्वांना आपल्या कामगिरीने प्रभावित करणाऱ्या बुमराहला ऑस्ट्रेलिया सारख्या खतरनाक संघा विरुद्ध टी-20 पदार्पण करण्याची संधी मिळाली. बुमराहने आपल्या पहिल्याच मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्रास देताना विकेट्स मिळवल्या. बुमराहने या मालिकेत 6 विकेट्स घेत भारताला 3-0 या फरकानी मालिका जिंकून दिली होती. त्याने या मालिकेत सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करताना 23 धावा देवून 3 विकेट्स घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
“पाकिस्तान संघ कोणता क्लब संघ नाही” शोएब अख्तर न्यूझीलंडवर कडाडला