प्रत्येक नवीन दिवस माणसाच्या जिवनात नवीन गोष्टी घेऊन येत असतो. काल झालेल्या चुका सुधारण्यासाठी माणूस नवीन दिवसाची नवी सुरुवात करण्याच्या आशेवर असतो. जिवनाचे हे सुत्र क्रिकेटलाही लागू होतो. क्रिकेटमध्ये एखाद्या मालिकेतील पहिल्याच सामन्याची सुरुवात खराब झाली. तर खेळाडू दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ठ खेळण्याचा प्रयत्न करतात.
सामना चालू असताना फक्त खेळाडूच नव्हे तर प्रेक्षक, प्रशिक्षक, समालोचक सर्वजण बेधुंद होऊन सामन्याचा आनंद लुटत असतात. त्यावेळी कुणाच्याही मनात हा विचार येत नाही की, या सर्व खेळाडूपैंकी एखाद्या खेळाडूचा आज मैदानावर शेवटचा क्षण असेल. तो यानंतर कधीच सामना खेळायचे तर सोडा बघूही शकणार नाही. तसं तर असा विचार दूर-दूरपर्यंत कुणाच्या मनात येत नाही.
एव्हाना एखादा खेळाडूही स्वत: असा विचार करत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये खेळाडूला मैदानावर दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांचे थेट निधन झाले. अर्थातच तो त्याचा अंतिम सामना ठरला.
तर जाणून घेऊया, अशा ३ खेळाडूंविषयी ज्यांचे मैदानावर दुखापत झाल्यामुळे किंवा दुसऱ्या कारणामुळे निधन झाले आहे. 3 International Cricketers Dead After Injured On Field
१. वसीम राजा (पाकिस्तान)
पाकिस्तान संघाकडून या क्रिकेटपटूने १९७०-८०च्या दशकात क्रिकेट खेळले होते. ऑगस्ट २००६मध्ये सुरेकडून काऊंटी क्रिकेट खेळताना ५० षटकांच्या सामन्यात मैदानावरच वसीम यांना हद्यविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांचे निधन झाले. वसीम यांची पत्नि एन्ने राजा यादेखील उत्तम महिला क्रिकेटपटू होत्या.
वसीम यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ५७ कसोटी सामन्यात २८२१ धावा केल्या होत्या. तर, ५४ वनडे सामन्यात ७८२ धावा केल्या होत्या. त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून, मैदानावर प्रशिक्षक म्हणून व क्रिकेट सामन्यात रेफ्री म्हणूनही काम पाहिले होते.
२. रमन लांबा (भारत)
भारतीय संघाने २२ फेब्रुवारी १९९८ला एक चांगला क्रिकेटपटू गमावला होता. हा क्रिकेटपटू म्हणजे रमन लांबा. दिल्ली संघाकडून ढाका येथे एका क्लब मॅचमध्ये फॉरवर्ड शॉर्ट लेगवर खेळताना लांबाच्या डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना डोक्यावर टोपी सोडून इतर काही नसते. डोक्यावर कोणतेही संरक्षण नसल्याने गंभीर दुखापत झाली होती. तो ३ दिवस कोमामध्ये होता आणि अखेर वयाच्या ३८व्या वर्षी त्याचे निधन झाले.
लांबाने भारताकडून ४ कसोटी सामन्यात एका अर्धशतकासह १०२ धावा केल्या होत्या. तर, ३२ वनडे सामन्यात १ शतक आणि ६ अर्धशतकांसह ७८३ धावा केल्या होत्या. आज जर ते असते तर त्यांचे वय ६० वर्ष असते.
३. फिलिप ह्यूज (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाच्या निधनाने संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरवली होती. फिलिप ह्यूज हा न्यू साउथवेल्सकडून शेफील्ड शील्ड सामन्यात खेळत होता. तेव्हा सीन एबोटचा बाउंसर चेंडू ह्यूजच्या डोक्याला लागला. त्यानंतर त्याची सर्जरी करण्यात आली. तरीही, तो कोमात गेला होता आणि २७ नोव्हेंबर २०१४ला त्याचा मृत्यू झाला.
ज्या सीन सीन एबोटचा चेंडू लागून ह्यूज जखमी झाला होता, त्या सीन एबोटही चुक नसता अनेक वर्ष स्वत:ला दोष देत होता. सीन ऑस्ट्रेलियाकडून १ वनडे व १ टी२० सामना खेळला असून हा २८ वर्षीय खेळाडू ऑस्ट्रेलिया संघात परतण्यासाठी उत्सुक आहे.
तर ह्यूजने त्याच्या कारकिर्दीत २६ कसोटी सामन्यात १५३५ धावा, २५ वनडे सामन्यात ८२६ धावा आणि एका टी२० सामन्यात ६ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
‘या’ भारतीय खेळाडूंनी सलामीला फलंदाजी केली असती, तर लावला…
युवराजबरोबर क्रिकेट खेळलेले ‘ते’ ७ खेळाडू, जे फारसे कुणाला नाही आता माहित
पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेणाऱ्या श्रीलंकेच्या ‘या’…