---Advertisement---

दुर्दैवी! मैदानावर क्रिकेट खेळताना दुखापती झाल्याने निधन झालेले 3 खेळाडू

On: शुक्रवार, नोव्हेंबर 25, 2022 9:19 AM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव चालूच असतं. जिंकल्यावर चाहत्यांना खूप आनंद होतो आणि हरल्यावर वाईट देखील वाटतं. त्यामुळे खेळाडू आणि चाहत्यांमध्ये हे सुंदर नातं निर्माण झालं आहे. एक सामना झाला की पुढच्या सामन्याची ओढ लागते, तसेच एक मालिका झाली की पुढच्या मालिकेची ओढ लागते. बऱ्याच वेळा महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये बाद फेरीत संघ पराभूत झाले की खेळाडू भावुक झालेले दिसले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेच वेळा झाले आहे. याबरोबरच क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा दुःखद घटना घडल्या आहेत.

खेळाडू खेळत असताना प्रेक्षकांना ते मनोरंजक वाटतं, पण कोणी हा विचार नाही करत की हा त्याचा अंतिम सामना होऊ शकतो, हे त्याच्या जीवनाचे देखील शेवटचे क्षण होऊ शकतात. असे काही खेळाडू आहेत ज्यांना दुखापत झाली आणि त्यांचं निधन झालं. ह्या घटनांनी प्रेक्षकांना भावुक केलं आहे. छोट्या सामन्यापासून मोठ्या सामन्यापर्यंतच्या खेळाडूंना दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. आपण आता जाणून घेऊया अशा ३ खेळाडूंबद्दल ज्यांचा मृत्यू खेळताना झालेल्या दुखापतीमुळे झाला.

१. वसीम रजा
पाकिस्तानचा हा खेळाडू १९७० आणि ८० च्या दशकात खेळायचा. ५७ कसोटी सामन्यात त्यांनी २८०० पेक्षा जास्ती धाव केल्या होत्या. सरे (Surrey) साठी ५० षटकांचा सामना खेळात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ह्यानंतर त्यांचं निधन झालं. रजा ह्यांना दोन मुले देखील होती.

२. रमन लाम्बा
ह्या भारतीय खेळाडूचं निधन खूप कमी वयात झालं. दिल्लीकडून खेळणारे लाम्बा ह्यांना बांग्लादेशच्या ढाकामध्ये एका क्लबच्या सामन्यात फॉरवर्ड शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षणासाठी ठेवले असताना त्यांना चेंडूचा डोक्याला मार लागला. तीन दिवस कोमा अवस्थेत ते होते त्यानंतर त्यांचं निधन झालं. १९९८ मध्ये त्यांचं वय ३८ होतं. भारतासाठी लाम्बा ह्यांनी ३२ वनडे सामने आणि ४ कसोटी सामने खेळले. प्रथम श्रेणीत त्यांच्या ८,००० पेक्षा जास्ती धावा होत्या.

३. फिल ह्युज
ह्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या अकस्मित निधनाने सर्व क्रिकेटप्रेमींना हादरून ठेवलं होतं. शेफील्ड शील्डच्या सामन्यात न्यू साऊथ वेल्सकडून खेळणारा गोलंदाज सीन ऍबॉटचा बाउन्सर त्याच्या डोक्याला लागला. चेंडूपासून वाचण्याचा भरपूर प्रयत्न करूनही चेंडू त्याच्या हेल्मेटला जाऊन आदळला. मेंदूत रक्त जमा झाल्यामुळे दोन दिवसांनी सिडनीच्या इस्पितळात ह्युजचा मृत्यू झाला. त्याला ६३ नाबाद (63 Not Out) असं देखील आता म्हणतात. कारण त्यादिवशी तो ६३ धावांवर फलंदाजी करत होता. त्याच्या जाण्याने सगळ्या क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज
NZvIND: पहिल्या वनडेत भारताची धमाकेदार सुरूवात! शिखर धवननंतर शुबमन गिलचीही फिफ्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---