भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. शिखर धवनची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. भारताकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत, जे भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतात. अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलण्यात हे खेळाडू पटाईत आहेत. अशाच तीन खेळाडूंबद्दल आपण आज पाहणार आहोत.
१.संजू सॅमसन
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने टीम इंडियासाठी सर्वोत्तम खेळ दाखवला. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाविरुद्ध तो तुफान फलंदाजी करू शकतो. संजूची खास गोष्ट म्हणजे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. संजूने भारतासाठी चार एकदिवसीय सामन्यांमध्ये ११८ धावा केल्या आहेत.
२.दीपक हुडा
काही काळापासून दीपक हुडाने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. खालील क्रमवारीत फलंदाजी करण्यात तो पटाईत खेळाडू आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. या खेळाडूने आयर्लंड दौऱ्यावर झंझावाती शतक झळकावले. त्याच वेळी, तो गोलंदाजीमध्ये खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते.
३. मोहम्मद सिराज
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने बुमराहची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. सिराजची लाईन लेन्थ अतिशय अचूक असून तो फलंदाजाला फटकेबाजी करण्याची कोणतीही संधी देत नाही. तो वेगात खूप चांगले बदल करतो, त्यामुळे फलंदाज लवकर बाद होतो. मोहम्मद सिराजने भारताकडून ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, यांच्याशिवायही असे अनेक खेळाडू आहेत जे या दौऱ्यात विशेष कामगिरी करू शकतात. विशेष म्हणजे वेगवान गोलंदाजी दीपक चाहरची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. दीपक चाहर मोठ्या कालावधीसाठी दुखापतीच्या कारणास्तव संघापासून दूर होता. याच कारणाने त्याला २०२२चा आयपीएल हंगाम खेळता आला नाही. त्यामुळे सध्या त्याच्या पुनरगामनाकडेही अनेक दिग्गज आणि चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?