---Advertisement---

बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 8:06 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा मैदानावर उतरतात, तेव्हा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. भारताचा संघ आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात आहे, तिथे वनडे आणि कसोटी  मालिकेबरोबर टी-20 मालिका सुद्धा खेळणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 2016 साली टी-20 मालिका आपल्या नावावर केली होती आणि 2018 साली दोन्ही संघात मालिका बरोबरीत सुटली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळले गेलेत. त्यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताने 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला आणि 8 सामने ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केलेत, तर उर्वरित एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करून आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

या लेखात आपण धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये भारताचे सर्वात मोठे 3 विजय पाहणार आहोत.

3. 27 धावांनी विजय, (मेलबर्न 2016)

सन 2016 साली तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला होता. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने सुरुवातीच्या तीन ही फलंदाजांनी शानदार खेळी केली. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 60 धावा केल्या होत्या. फलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनाच्या मदतीने भारताने 20 षटकात 184 धावा केल्या होत्या.

भारताच्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍराॅन फिंचला वगळता इतर कोणत्याच फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. फिंच 72 धावा करून धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 157 धावा करू शकला आणि भारतीय संघाने हा सामना 27 धावांनी जिंकला.

2. 37 धावांनी विजय, (ऍडलेड 2016)

सन 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत निराशाजनक पराभवानंतर भारताने टी-20 मालिकेत दमदार सुरुवात केली. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर 20 षटकात 188 धावा केल्या.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 90 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ 189 धावांचा पाठलाग करताना अडखळला. ऍराॅन फिंचसोडून इतर फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा संपूर्ण डाव 151 धावांवर गडगडला. अशा प्रकारे भारताने हा सामना 37 धावांनी जिंकला.

1. 73 धावांनी विजय, (ढाका 2014)

सन 2014 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 28 व्या सामन्यात भारतीय संघाने मोठ्या फरकाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. या सामन्यात भारतीय संघाने टी-20 मधील सर्वात मोठा विजय प्राप्त केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 159 धावसंख्या उभारली होती. यामध्ये युवराजने सर्वाधिक 60 धावांची खेळी साकारली होती.

भारताच्या 160 धावांचा पाठलाग करायला आलेला ऑस्ट्रेलिया संघ पत्त्याच्या पानांप्रमाणे कोसळला. भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर पूर्ण संघ 86 धावांवर गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाने 73 धावांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

ट्रेंडिंग लेख-

पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज

भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला

वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम

महत्त्वाच्या बातम्या-

अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया

अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---