वनडे क्रिकेटप्रमाणेच टी-20 क्रिकेटमध्येही नेहमीच आपल्याला संघांकडून मोठ- मोठी धावसंख्या उभारलेली पाहायला मिळते. कारण टी-20 हा प्रकाराच मूळात फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु बर्याचदा या प्रकारात पाहिला मिळते की, कमी धावसंख्येवर संघाचा डाव गुंडाळला जातो. या प्रकारात असे तेव्हा होते, जेव्हा फलंदाज जलद धावा करण्याच्या ओघात आपली विकेट गमावून बसतो. तसेच प्रतिस्पर्धी संघातील शानदार गोलंदाजीच्या आक्रमणाचे फलंदाजांकडे उत्तर नसते. या प्रकारात बर्याचदा काही संघ 100 धावांचाही टप्पा पार करू शकत नाहीत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाबाबत बोलायचं झालं, तर यांच्यात नेहमीच मोठ्या धावसंख्येचे सामने आपल्याला बघायला मिळतात. मात्र, काही वेळा भारतीय संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत, ज्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे भारताने कमी धावसंख्या फलकावर लावल्या आहेत.
या लेखातून आपण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये केलेल्या 3 सर्वात कमी धावसंख्या पाहणार आहोत.
3. 126 धावा (विशाखापट्टणम, 2019)
सन 2019 साली भारतीय दौर्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताने पहिल्या टी-20 सामन्यात आपल्या सर्वात कमी तिसर्या क्रमांकाच्या धावसंख्येची नोंद केली. विशाखापट्टणम येथील मैदानावर 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने कमी धावसंख्या उभारली होती. या सामन्यात भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 126 ही धावसंख्या केली होती. या सामन्यात धोनीने 37 चेंडूत 29 धावांची संथ खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते.
त्यामुळे या सामन्यात सगळ्यांना वाटले होते की ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांनी या आव्हानाचा पाठलाग करताना 7 विकेट्स गमावून शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता.
2. 118 धावा (गुहावाटी, 2017)
सन 2017 साली गुहावाटीच्या मैदानावर भारतीय फलंदाजाची खराब कामगिरी पाहिला मिळाली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला होता. भारताचे सुरुवातीचे चार फलंदाज 30 धावांच्या आतच बाद झाले. त्यानंतर इतर फलंदाजांनी छोटेखानी खेळी करून भारतीय संघाला 20 षटकात सर्वबाद 118 धावसंख्या उभारून दिली होती. हे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्स गमावून सहज पूर्ण केले होते.
1. 74 धावा (मेलबर्न, 2008)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2008 साली मेलबर्न येथे खेळण्यात आलेल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने सर्वात खराब प्रदर्शन केले होते. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली होती. भारताकडून सर्वाधिक 26 धावा इरफान पठाणने काढल्या होत्या. त्याचबरोबर इतर भारतीय खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नव्हती. संपूर्ण संघ 74 धावांवर गडगडला होता. ही भारताची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. हा सामनाही ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने जिंकला होता.
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव
Video: आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळायला न मिळालेल्या फलंदाजाची कमाल; ५५ चेंडूत ठोकले दीडशतक