ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.
आता शेवटचा सामना उद्या दुपारी १२ वाजता हॅमिल्टनला होणार आहे. भारतीय संघ आजपर्यंत १० वेळा ३ सामन्यांची टी२० मालिका खेळला आहे. यात तब्बल ९ वेळा संघाने मालिकेत विजय मिळवला आहे तर एक मालिका केवळ बरोबरीत सुटली आहे. तसेच भारताने एकदाही ३ सामन्यांची टी२० मालिका गमावली नाही.
त्यामुळे उद्याच्या सामन्यातही संघ विजय मिळवून मालिकेत विजय संपादन करण्यासाठी इच्छुक असेल.
महत्त्वाची बातमी-
–या ५ विक्रमांमुळे रोहित शर्माच आहे टी२०मध्ये विराटपेक्षा मोठा खेळाडू
–तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती
–ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस