भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला टी-२० कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा आपल्या कर्णधारपदाची सुरुवात विजयासह करण्यासाठी जीवाचे रान करताना दिसेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाचे ३ खेळाडू आहेत, जे संघाला विजय मिळवून देऊ शकतात.
रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्मा हा धोकादायक फलंदाज आहे, जो एकट्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवू शकतो. जयपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत रोहितकडे कोहलीला मागे टाकण्याची संधी असेल. जर या मालिकेत रोहित शर्माने १९० धावा केल्या, तर त्याला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला (३२२७ धावा) मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची संधी असेल.
मात्र, या बाबतीत त्याला न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (३१४७ धावा) याच्याशी देखील स्पर्धा करावी लागेल. रोहितने सध्या टी२० क्रिकेटमध्ये ३०३८ धावा केल्या असून तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच या मालिकेत तीन षटकार मारताच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकार पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. केवळ वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (५५३) आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (४७६) यांनी हा आकडा गाठला आहे. जर रोहितने या मालिकेत १० षटकार ठोकले, तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण करेल. हा आकडा गाठणारा तो मार्टिन गप्टिलनंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.
व्यंकटेश अय्यर
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात व्यंकटेश अय्यरला पदार्पणाची संधी मिळू शकते. आयपीएल २०२१ मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर एक खेळाडू खूप चर्चेत आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजीसोबतच व्यंकटेश अय्यर गोलंदाजीमध्येही तरबेज आहे. व्यंकटेश अय्यर हा हार्दिक पांड्यापेक्षा चांगला अष्टपैलू सिद्ध होऊ शकतो.
व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२१ मध्ये १० सामन्यांमध्ये १२८.४७ च्या स्ट्राइक रेटने ३७० धावा केल्या आहेत, ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून टी-२० मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. व्यंकटेश अय्यरने एकूण ४८ टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये २४ बळी घेतले आहेत. व्यंकटेश अय्यरने १० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७ आणि २४ ‘लिस्ट ए’ सामन्यांमध्ये ५.५० च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहित कुशल रणनीतिकार, तर प्रशिक्षक द्रविडमुळे बनेल चांगले सांघिक वातावरण- केएल राहुल