२००८ साली क्रिकेटजगतात एका नव्या टी२० लीगने एंट्री केली होती. ही लीग म्हणजे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). भारताने २००७सालचा टी२० विश्वचषक पटकावल्यामुळे लोकांची टी२० क्रिकेटमधील रुची वाढली होती. अशात आयपीएलची सुरुवात झाल्यामुळे लवकरच त्याच्या प्रसिद्धीत वाढ झाली.
जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या हंगामात जगभरातील अनेक संघांच्या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचाही समावेश होता. शाहीद आफ्रिदी, शोएब मलिक, शोएब अख्तर, उमर गुल आणि कामरान अकमल यांच्यासारखे एकूण ११ पाकिस्तानी खेळाडू आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळले होते. पण, त्याचवर्षी मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर परिस्थितीत बदल झाले. त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्रतिबंध लावण्यात आले.
या लेखात, पाकिस्तानच्या त्या ११ खेळाडूंपैकी ३ खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे, ज्यांना क्वचितच कोण ओळखत असेल (3 Pakistani Cricketers You Might Not Know Once Played In IPL) –
सलमान बट्ट – कोलकाता नाईट रायडर्स
पाकिस्तान संघाचा माजी सलामीवीर फलंदाज सलमान बट्ट हा आयपीएल २००८मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. यावेळी त्याने केकेआरकडून पूर्ण हंगामात ७ सामने खेळले होते. दरम्यान त्याने २७.५७च्या सरासरीने १९३ धावा केल्या होत्या. यात त्याच्या सर्वाधिक ७३ धावांचा समावेश होता, ज्या त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात केल्या.
सलमानने त्याचा शेवटचा आयपीएल सामना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळला होता. यावेळी २४ धावांवर त्याला एस श्रीसंतने बाद केले होते.
यूनिस खान – राजस्थान रॉयल्स
आयपीएलच्या पहिल्या हंगामात विजेता ठरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा यूनिस खान हा भाग होता. पण, दुर्दैवाने त्याचा आयपीएल पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा आयपीएल सामना ठरला. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू यूनिसला त्याच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने आपल्या एकमेव आयपीएल सामन्यात केवळ ३ धावा केल्या होत्या.
मोहम्मद आसिफ – दिल्ली कॅपिटल्स
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ हा आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. यावेळी पूर्ण हंगामात त्याने ८ सामने खेळत ८ विकेट्स चटकावल्या होत्या. तर फलंदाजी करताना त्याने ३ धावा केल्या होत्या.
विरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली संघाकडून खेळताना आसिफने त्याचे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन डेक्कन चार्जर्स संघाविरुद्ध केले होते. यावेळी त्याने १९ धावा देत ऍडम गिलख्रिस्ट आणि व्हिव्हिएस लक्ष्मणची विकेट घेतली होती.
ट्रेंडिंग लेख –
कट्टर विरोधक चेन्नईच्या गटात सामील झालेले मुंबई इंडियन्सचे एकेवेळचे ३ धुरंदर
ज्या ऑस्ट्रेलियामुळे विश्वचषक खेळता आला नाही त्यांनाच फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवणारा क्रिकेटर
कसोटी कारकिर्दीत दोन वेळा त्रिशतक करणारे फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे रँकिंगमध्ये पुन्हा विराट-रोहितनेच मारली बाजी; तर टी२०मध्ये या भारतीय खेळाडूने टाकले फिंचला मागे
निवृत्तीनंतर सुरेश रैना करणार हे काम ; जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना लिहिले पत्र
व्हिडिओ: पाकिस्तानच्या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर उगारली बॅट