आयपीएल २०२० ही स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. पण त्यानंतर जगभरात कोरोना विषाणू पसरल्यामुळे विशेषतः भारतात कोरोना विषाणूची वेगाने वाढ झाल्यानंतर ही आयपीएल टी२० स्पर्धा बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केली. आता पुन्हा ही स्पर्धा खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळली जाईल.
त्यामुळे काही क्रिकेटपटूंना फायदाही झाला आहे. तो असा की मार्चमध्ये आयपीएल झाली असती तर काही जखमी खेळाडू सुरुवातीपासूनच या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नसते. परंतु आता ही स्पर्धा ५ महिन्यांनंतर होणार आहे, तसेच खेळाडू गेले अनेक दिवस घरी असल्याने त्यांना विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्या पासून हे खेळाडू आपल्या संघासाठी खेळताना दिसतील.
या लेखात त्या ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांना आयपीएल २०२० पुढे ढकलण्यात आल्याने फायदा झाला आहे. या खेळाडूंनी यावेळी आपल्या तंदुरुस्तीवर काम केले आहे. ज्यामुळे ते आता अधिक चांगले खेळताना दिसू शकतात.
१. दीपक चाहर
आयपीएल पुढे ढकलल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याला फायदा झाला आहे. तो त्याच्या संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यावर संघाची गोलंदाजी खूप अवलंबून असते. सध्या हा खेळाडू तंदुरुस्त होऊन परतला आहे. ज्यामुळे आता तो संघात निश्चितच दिसेल.
तो मार्च महिन्याच्या आधी दुखातपतग्रस्त झाला होता. त्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत होता. परंतु आता तो तंदुरुस्त आहे.
दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सुरुवातीच्या षटकांत एक महत्त्वपूर्ण गोलंदाज म्हणून काम करतो. सध्या तो डेथ ओव्हर्समध्येही चांगली कामगिरी करताना दिसला. सध्या तो वडिलांच्या देखरेखीखाली फिटनेस सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.
२. कगिसो रबाडा
आयपीएल पुढे ढकलल्यामुळे दिल्ली कॅपिटल संघाचा खेळाडू कगिसो रबाडाला फायदा झाला. तो त्याच्या संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. त्यावर संघाच्या गोलंदाजीची जास्त जबाबदारी असते. पण तो देखील मागील काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता. आता सध्या या खेळाडूला तंदुरुस्तीसाठी वेळ मिळाला आणि त्याने स्वतःला तंदुरुस्त केलं आहे. ज्यामुळे आता त्याचे संघात परतणे निश्चित आहे.
गेल्या हंगामात दिल्ली संघासाठी कगिसो रबाडाने खूप महत्वाची भूमिका बजावली होती. जास्त विकेट घेण्याच्या बाबतीत दिल्ली संघाकडून तो पहिलाच खेळाडू होता. जेव्हा २९ मार्च रोजी आयपीएलची सुरुवात होणार होती. त्यावेळी रबाडा पहिल्या सामन्यापासून संघासाठी उपलब्ध होऊ शकला नसता. परंतु आता १९ सप्टेंबरपासून आयपीएल युएईमध्ये खेळला जाईल तेव्हा पहिल्या सामन्यापासूनच कगिसो रबाडा संघासाठी उपलब्ध असेल. त्याचा फायदा आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला होऊ शकतो.
३. जोफ्रा आर्चर
आयपीएल पुढे ढकलल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू जोफ्रा आर्चरलाही फायदा झाला आहे. गेल्या काही मोसमांमधून तो आपल्या संघासाठी महत्वाच्या वेगवान गोलंदाजाची भूमिका निभावताना दिसत आहे. त्याच्यावर संघाची गोलंदाजी अवलंबून आहे. डेथ ओव्हर्समध्ये जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. मात्र तो काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होता. पण आता तो तंदुरुस्त होऊन परतला असून इंग्लंडच्या संघात दाखल झाला आहे. सध्या तो कसोटी सामनेदेखील खेळला आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघात आता आनंदाचे वातावरण असेल. कारण आता पहिल्या सामन्यापासून जोफ्रा आर्चर त्या संघाचा सदस्य असेल, आणि त्याची गोलंदाजी अधिक मजबूत दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्स आहे आयपीएल विजेतेपदाचा दुसरा प्रबळ दावेदार, तर या संघाला आहे सर्वाधिक संधी
५ वर्षाचा सुखाचा संसार मोडला, जगातील टॉप ऑलराऊंडरने मांडली वेगळी चुल
ट्रेंडिंग लेख-
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली