राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर भारतीय संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या वरिष्ठ खेळाडूंनी खेळाच्या छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. आता गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. अनेक युवा खेळडूंची संघात एंट्री होऊ शकते, तर अनेक वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना गौतम गंभीरच्या भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नाही.
3) रवींद्र जडेजा – स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघासोबत आहे. त्यानं टीम इंडियासाठी अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कामगिरीत घसरण झाली आहे. टी20 विश्वचषकातही जडेजा पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्या उलट अक्षर पटेलनं त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्यामुळे 35 वर्षीय रवींद्र जडेजाला आता भारतीय संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
2) अजिंक्य रहाणे – अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. विराट कोहली कर्णधार असताना रहाणे भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ होता. मात्र आता त्याच्या टीम इंडियात परतण्याच्या शक्यता फार कमी आहेत. रहाणे सध्या 36 वर्षांचा असून त्यानं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये खेळला होता. आता त्याच्या जागी टीम इंडियात श्रेयस अय्यर, शुबमन गिल अशा युवा खेळाडूंची एंट्री झाल्यानं त्याला गंभीरच्या संघात संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
1) चेतेश्वर पुजारा – राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजारानं तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाची खूप वर्ष सेवा केली. मात्र गेल्या काही काळापासून तो टीमच्या आतबाहेर आहे. जेव्हा पुजाराला संघातून बाहेर करण्यात आलं, तेव्हा त्यानं इंग्लंडमध्ये जावून काऊंटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. मात्र तरीही त्याला आता भारतीय संघात स्थान मिळणं अवघड आहे. चेतेश्वर पुजारा आता 36 वर्षांचा असून, भविष्याकडे पाहता गंभीर आता त्याला आपल्या टीममध्ये खेळवणार नाही, असंच दिसतं.
महत्त्वाच्या बातम्या –
केकी तारापोरपासून गौतम गंभीरपर्यंत, 25 मुख्य प्रशिक्षकांनी सांभाळली टीम इंडियाची जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी
भारतीय क्रिकेटमध्ये ‘गंभीर’ युगाला सुरुवात, चॅम्पियन खेळाडू बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच!
भारतीय संघाला मिळणार नवे बँटींग बाॅलिंग कोच, दोघांनी गाजवले आहेत मैदान