आईपीएल २०२१ मध्ये २ वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे (केकेआर) प्रदर्शन खूपच खराब राहिले. चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या खराब प्रदर्शनाबद्दल निंदा केली होती आणि कर्णधार बदलीची मागणी केली होती. परंतु आईपीएलला कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा आईपीएल सुरु होण्याचा मार्गावर आहे. बीसीसीआयने येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल २०२१ चे उरलेले सामने आयोजित करण्याचे ठरविले आहे.
असे असले तरी, अजूनही परदेशी खेळाडू उर्वरित हंगामात भाग घेणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पुढील व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बघता इंग्लंड संघाचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीत, अशी ‘ईसीबी’चे डिरेक्टर ऍशले जाईल्स यांनी माहिती दिली आहे. अशात केकेआरचा कर्णधार आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू ऑयन मोर्गनच्या जागी संघाचे नेतृत्त्वपद भूषवू शकणाऱ्या खेळाडूंमध्ये ३ नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. त्यांची आपण या लेखातून चर्चा करणार आहोत.
३. आंद्रे रसेल
आंद्रे रसेलला कर्णधारपदाचा कमी अनुभव जरी असला; तरीही त्याने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये राजशाही रॉयल्स संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. अनुभवी खेळाडूं असण्याबरोबर रसेल एक आक्रमक फलंदाजही आहे, जो संघाला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे रसेलवर येत्या काळात कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
२. दिनेश कार्तिक
केकेआरच्या कर्णधारपदी सर्वात जास्त नाव ज्याचे घेतले जात आहे, तो म्हणजे दिनेश कार्तिक. कार्तिक गेली कित्येक वर्षे केकेआरसाठी कर्णधारपद भूषवत होता. परंतु आयपीएल २०२० मध्ये संघाच्या खराब कामगिरीमुळे अर्ध्यातून कार्तिकला कर्णधारपदावरून काढण्यात आले होते आणि ऑयन मोर्गनला कर्णधारपदाची जवाबदारी देण्यात आली होती. आता मोर्गनच्या अनुउपास्थित पुन्हा कार्तिकला कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे.
१. पॅट कमिन्स
केकेआर संघातील अनुभवी खेळाडूंबद्दल बोलायला गेले तर पॅट कमिन्स याचे नाव प्रामुख्याने येते. तो एक दमदार अष्टपैलू असल्याने त्यालाही केकेआरचा कर्णधार बनवला जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया कसोटी संघात कमिन्स उपकर्णधाराची भूमिका निभवतो. अशामध्ये कमिन्सला मॉर्गनच्या जागी केकेआरचा कर्णधारसुद्धा केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ क्रिकेटपटूंनी युवा वयातच लीलया पेलली कर्णधारपदाची जबाबदारी, एका भारतीयाचा समावेश
अशी ३ कारणे, ज्यामुळे युएईत आयपीएल खेळवण्याचा निर्णय ठरू शकतो अयशस्वी
डोळ्याची पापणी लवण्याआधी यष्टीरक्षकाने उडवली दांडी, व्हिडिओ पाहून आठवेल ‘एमएस धोनी’!