क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाप्रमाणे यष्टीरक्षण हे देखील एक कौशल्य मानले जाते. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक नेहमी आपल्या संघांसाठी एखादा अप्रतिम झेल पकडून अथवा चापल्ययुक्त यष्टीरक्षणाने संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडतो. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट, दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आणि भारताचा एमएस धोनी यांना क्रिकेट इतिहासातील सर्वात चपळ यष्टीरक्षक म्हटले जातात.
इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये देखील या दिग्गजांप्रमाणेच एका युवा यष्टीरक्षकाने दर्जेदार यष्टीरक्षणाचा नमुना सादर केला. या लाजवाब यष्टीचितचा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे.
मायकेल बर्गेसचे अप्रतिम यष्टीरक्षण
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉर्विकशायर विरुद्ध नॉटिंघमशायर या सामन्यात वॉर्विकशायरचा यष्टीरक्षक मायकेल बर्गेसने एक अविश्वसनीय यष्टीचीत करून दाखवले. नॉटिंघमशायरच्या दुसऱ्या डावात जो क्लार्क फलंदाजी करत असताना वॉर्विकशायरचा वेगवान गोलंदाज ओजे हेनन याने चेंडू लेग साईडला फेकला. मात्र, बर्गेस यष्ट्यांच्या अगदी जवळ असल्याने त्याने पापणी लवते इतका वेळ घेत क्लार्कला यष्टिचित केले. क्लार्क याला विश्वास वाटला नाही इतक्या लवकर हे यष्टीचित केले गेले होते. क्लार्कचा किंचितसा वर उचलला गेल्यानंतर बर्गेसने चित्याच्या चपळाईने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
https://twitter.com/CountyChamp/status/1399262656029147138?s=20
वॉर्विकशायरचा मोठा विजय
या सामन्यात वॉर्विकशायरने नॉटिंघमशायरवर १७० धावांनी मोठा विजय मिळवला. नॉटिंघमशायरचा संघर दुसऱ्या डावात केवळ १३८ धावा करु शकला. तत्पूर्वी, वॉर्विकशायरने आपल्या पहिल्या डावात ३४१ तर दुसऱ्या डावात २६४ भावा उभारल्या होत्या. नॉटिंघमशायरने आपल्या पहिल्या डावात २९७ धावा बनविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
खेळाडूंची सुरक्षा ते टी२० विश्वचषकाची तयारी; ‘या’ कारणांमुळे युएईत आयपीएल घेण्याचा निर्णय योग्य
मास्टर ब्लास्टरचा ‘हा’ विश्वविक्रम धोक्यात, जेम्स एंडरसन येत्या मालिकेत करणार आपल्या नावे
फलंदाजीचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची माहीकडून बोलती बंद; म्हणाला ‘आणखी काही टिप्स सर’