Most Expensive Retention IPL 2025: पुढील वर्षी आयपीएलचा 18 वा हंगाम आयोजित खेळला जाईल. या हंगामापूर्वी एक मेगा लिलाव देखील आयोजित केला जाणार आहे. या लिलावापूर्वी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली होती. गुरुवारी (31 ऑक्टोबर), सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बोर्डाकडे सादर केली आहे. अधिकतर फ्रँचायझींनी आपल्या अनुभवी खेळाडूंना रिटेन केले आहे.
अनेक खेळाडूंना 20 कोटींहून अधिक रक्कम देऊन संघात कायम ठेवण्यात आले आहे. या लेखात, आम्ही अशा 3 खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांना मेगा लिलावापूर्वी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत कायम ठेवण्यात आले आहे.
3. विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएळ 2025 च्या मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांच्या नावांचा समावेश आहे. कोहलीला कायम ठेवण्यासाठी फ्रँचायझीने 21 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या आगामी हंगामात तो पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यताही वर्तवली जातेय. आरसीबीने एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही आणि त्यामुळेच कोहली पुन्हा फ्रँचायझीसाठी हा मोठा निर्णय घेऊ शकतो.
2. निकोलस पूरन
वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन हा गेल्या तीन हंगामांपासून आयपीएलच्या लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीचा भाग आहे. पूरन आयपीएलच्या 18 व्या हंगामात लखनऊ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. लखनऊने पुरनला रिटेन करण्यासाठी 21 कोटी रुपये खर्च केले आहेत. पुरन व्यतिरिक्त लखनऊने आणखी 4 खेळाडूंना कायम ठेवले आहे.
1. हेन्रिक क्लासेन
हेन्रिक क्लासेन हा आयपीएल 2025 मधील रिटेन केलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. हैदराबादने क्लासेनला 23 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले आहे. क्लासेन हा घातक फलंदाज आहे आणि फ्रँचायझी त्याला कोणत्याही किंमतीला लिलावात पाठवू इच्छित नाही. आयपीएल 2024 मध्ये, क्लासेनने संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा –
कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?
आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा
पंत-राहुलवर इतक्या कोटी रुपयांची बोली लागेल! आकाश चोप्रांनी आकडा सांगितला