विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या टी-२० सांघाचे नेतृत्वपद सोडल्यानंतर रोहित शर्मावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती आणि संघाला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रोहितला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
अशात आता बीसीसीआयने अधिकृतरित्या (BCCI) रोहित शर्मा (rohit sharma) याला भारताचा नवीन एकदिवसीय कर्णधार घोषित केले आहे. रोहित कर्णधार झाल्यामुळे आता एकदिवसीय संघातील उपकर्णधाराचे पद रिकामे झाले आहे.
संघात उपकर्णधाराचे पद महत्वाचे असते. अनेकदा जेव्हा कर्णधार सामन्यासाठी उपस्थित नसतो किंवा जेव्हा कर्णधाराला सहकार्यांची गरज असते, तेव्हा उपकर्णधार खूप कामी येत असतो. भारतीय संघात सध्या असे अनेक खेळाडू आहेत, जे भविष्यात संघाचे कर्णधार देखील बनू शकतात. अशात बीसीसीआय त्यांना उपकर्णधार बनवून एकप्रकारे त्यांची चाचणी घेऊ शकते. आपण या लेखाल अशाच तीन भारतीय खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत, जे सध्या भारताच्या एकदिवसीय संघाचे उपकर्णधार बनण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत.
तीन भारतीय खेळाडू, जे एकदिवसीय संघाचे उपकर्णधार बनू शकतात
३. श्रेयस अय्यर (shreyas iyer)
भारतीय संघाचा उत्कृष्ट युवा फलंदाज श्रेयस अय्यरला भविष्यातील मोठा खेळाडू मानले जात आहे आणि त्याने आतापर्यंतच्या त्याच्या छोट्या कारकिर्दीत अनेकदा महत्वाची खेळी करून दाखवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे. तसेच त्याने आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे देखील नेतृत्व केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना त्याने संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवले होते. अशात रोहितच्या नेतृत्वात अय्यर उपकर्णधार बनण्यासाठी चांगला पर्याय आहे. अय्यर सध्या दमादमाने भारताच्या तिन्ही संघांमध्ये स्वतःचे स्थान भक्कम बनवत आहे. अशात त्याच्यावर एकदिवसीय संघाचे उपकर्णधारपद सोपण्यात आले, तर त्यात प्रश्न उपस्थित होणार नाहीत.
२. रिषभ पंत (rishabh pant)
भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने आता संघात स्वतःचे एक वेगळे स्थान बनवले आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर पंतने त्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. फलंदाजाच्या रूपात आपण संर्वांनी पंतची गुणवत्ता पाहिले आहे आणि त्याने अनेकदा संघाला शेवटच्या क्षणांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व केले. पंत एक यष्टीरक्षक असल्यामुळे त्याच्यावर सर्वांचेच लक्ष लागून असते आणि तो गोलंदाजांना अनेकदा मोलाचा सल्ला देखील देतो. त्याचे आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता, जर पंतला भारताच्या एकदिवयीस संघाचा उपकर्णधार बनवले गेले, तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल.
३. केएल राहुल (kl rahul)
भाराच्याच नवीन एकदिवसीय उपकर्णधाराच्या शर्यतीत केएल राहुलला प्रमुख दावेदार मानले जात आहे. केएल राहुल भारताचा मर्यादित षटकांसाठीचा एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तो एक युवा खेळाडू असल्यामुळे भविष्यात तो संघाचा कर्णधार देखील बनू शकतो. नुकत्याचा पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुलकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशात आगामी काळात देखील बीसीसीआय त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकते, यात शंका नाही. याच पार्श्वभूमीवर राहुल सध्या भारताच्या एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-