विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाच्या झालेल्या पराभवामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) पुढील दौऱ्यासाठी कडक पाऊले उचलण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच सध्याच्या कसोटी संघातील काही खेळाडूंनाही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तावली जात आहे. भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनामुळे काही खेळाडूंना आपले स्थान गमवावे लागणार आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे याच्या स्थानावरसुद्धा टांगती तलवार आहे.
गेली कित्येक वर्ष रहाणे भारतीय कसोटी संघासाठी मधल्या फळीत प्रमुख फलंदाजाची भूमिका साकारत आहे. रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. परंतु, रहाणेची ऑस्ट्रेलियाविरुद्धची शतकीय खेळी सोडल्यास त्याचे प्रदर्शन एवढे चांगले राहिले नाही. तसेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ४ सामन्यात केवळ १ अर्धशतक मारले होते. संपूर्ण मालिकेत त्याने एकूण ११२ धावा केल्या होत्या. याखेरीज विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात ४९ धावा तर दुसऱ्या डावात केवळ १५ धावा केल्या होत्या.
भलेही त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. परंतु महत्वाच्या क्षणी या फलंदाजाने निराशाजनक कामगिरी केली आहे. म्हणून रहाणेच्या खराब फॉर्ममुळे त्याला विश्रांती देत बाहेर बसलेल्या खेळाडूंना आजमावून बघण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही भारतीय खेळाडू रहाणेची जागा घेऊ शकतात. त्याच खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
१. हनुमा विहारी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत विजय मिळून देणाऱ्या खेळाडूंमध्ये हनुमा विहारीचेही नाव आहे. विहारीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत दुखापत होऊनसुद्धा त्याने हिंमतीने भेदक गोलंदाजीचा सामना केला आणि सामना अनिर्णीत ठेवण्यात मुख्य भूमिका निभावली. विहारीने आजवर भारतीय संघासाठी १२ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३२.८४च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. विहारीचे आकडे बघायला नाजूक वाटतात. परंतु, विहारीला सतत संधी मिळाली नाही. त्यामुळे आता रहाणेच्या जागी विहारीला संधी मिळू शकते.
२. केएल राहुल
रहाणेच्या खराब फॉर्ममुळे केएल राहुलचे कसोटी संघात पुनरागमन होण्याची शक्यात दिसत आहे. जर, भारतीय संघ सलामीमध्ये रोहित, गिल आणि मयंक यांचावर भरोसा दाखवणार असेल तर ते राहुलला मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवू शकतात. राहुलने एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. तो सहसा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वरच्या फळीत फलंदाजी करताना दिसतो. परंतु कसोटी त्याला सलामीला संधी मिळणे थोडे कठीण आहे. परंतु, भारतीय संघ राहुलला मधल्या फळीत संधी देऊ शकतो.
१. शुबमन गिल
गिलचे नाव या यादीत बघून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल तर सांगू इच्छितो की, गिल आजवर भारतीय संघासाठी सलामी फलंदाजी करत आला आहे. त्याने कसोटी पदार्पणातच उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली होतो. गिलला ‘स्विंग’ चेंडू खेळण्यास कठीण जात आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन गिलला मधल्याफळीत खेळवून पाहू शकते.
महत्वाच्या बातम्या-
बलाढ्य बीसीसीआय पुन्हा एकदा फेल, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ‘ही’ महत्त्वपुर्ण मागणी फेटाळली
टेस्ट चँपियनशीप पराभवानंतरही भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी, माजी निवडकर्ता संतापला
‘टीम धवन’सोबत २ निवडकर्तेही जाणार श्रीलंकेला, पाहा १८ सदस्यीय सपोर्ट स्टाफची संपूर्ण यादी