आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त सामने खेळले गेले आहेत. या सामन्यात अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, तर काही नावाजलेल्या खेळाडूंनी निराशाच केली. पंजाबचा कर्णधार केएल राहुल, दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन हे सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर आहेत. मात्र, टी20 स्पर्धा गाजवणारे काही दिग्गज अजूनही बाकावरच बसले आहेत. त्यांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली असती तर त्यांनी नक्कीच चमकदार कामगिरी केली असती. या लेखात अशा तीन दिग्गज खेळाडूंची माहिती देणार आहोत, ज्यांना अद्यापही संधी मिळालेली नाही.
ख्रिस लिन
दिग्गज फलंदाज ख्रिस लिनला 2 कोटीची मूळ किंमत देऊन मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. या हंगामात लिनला अद्याप एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. ख्रिस लिन हा एक स्फोटक फलंदाज आहे आणि त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त खेळी खेळल्या आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी सलामीवीर म्हणून जबरदस्त कामगिरी बजावली आहे. म्हणूनच अंतिम ११ जणांच्या संघामध्ये लिनला स्थान मिळालेले नाही. तथापि, जर त्याला खेळण्याची संधी मिळाली असती, तर त्याने जबरदस्त कामगिरी केली असती. त्याचे मोठे कारण म्हणजे मुंबईचे होम ग्राऊंड अबू धाबी आहे आणि अबू धाबी येथे झालेल्या टी10 लीग दरम्यान लिनने बरेच सामने खेळले होते. त्याला तेथील परिस्थितीची चांगली जाणीव आहे.
मिशेल मॅक्लेनेघन
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लेनेघनला या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मॅक्लेनेघन मात्र मुंबई पदार्पणाचा भाग नव्हता आणि त्यांना बदली म्हणून संबोधले गेले. मॅक्लेनेघन हा बऱ्याच वर्षांपासून मुंबई संघाचा सदस्य आहे आणि त्याने आपल्या गोलंदाजीने बरेच सामने जिंकवून दिले आहेत. जर त्याला संधी मिळाली असती, तर त्याने जबरदस्त कामगिरी केली असती.
मॅक्लेनेघनकडे टी20 चा बराच अनुभव आहे पण या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. यामागचे कारण असे की, मुंबई संघात जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी आणि जेम्स पॅटिन्सनसारखे दिग्गज गोलंदाज आहेत आणि म्हणूनच मॅक्लेनेघनला अंतिम ११ मध्ये जागा मिळाली नाही.
मिशेल सँटनर
मिशेल सँटनर हा फिरकी गोलंदाज आहे. तो एक अष्टपैलू खेळाडूही आहे. त्याने अनेकदा वेगवान डाव खेळले आहेत. मात्र, अद्याप या हंगामात त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. चेन्नईचा संघ सतत पराभूत होत आहे. जर सँटनरला संधी मिळाली असती, तर तो फलंदाजी व गोलंदाजीमुळे संघाला बळकटी देऊ शकला असता.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिलांच्या अंत्यसंस्काराला दुबईत असलेला आयपीएल स्टार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी
हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला
Video: अफलातून! पंजाबच्या धुरंदराने चपळाई दाखवत ‘दबंग’ पांडेला धाडलं तंबूत
ट्रेंडिंग लेख –
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ
असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश