इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या (IPL 2022) हंगामाची सांगता झाली. नवख्या गुजरात टायटन्सने या हंगामाचे जेतेपद पटकावले. १० फ्रँचायझी सहभागी असलेल्या या आयपीएल हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी बेंगलोरमध्ये मेगा लिलाव पार पडला होता. या लिलावात तब्बल २०४ खेळाडूंवर बोली लावत फ्रँयाचझींनी त्यांना विकत घेतले. २० लाखांपासून ते कित्येत कोटींपर्यंतच्या रक्कम देत फ्रँचायझींनी तगडे संघ तयार केले. परंतु यातील बऱ्याचशा खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्थातच त्यांनी पूर्ण हंगाम बाकावर बसून काढला.
या लेखात आम्ही अशाच ३ खेळाडूंचा आढावा घेतला आहे, ज्यांनी आयपीएल २०२२मधील एकही सामना न खेळूनसुद्धा १ कोटींपेक्षा जास्त पैसे कमावले.
राजवर्धन हंगारगेकर-
१९ वर्षांखालील विश्वचषकात प्रभावी प्रदर्शन करत राजवर्धन हंगारगेकरने (Rajvardhan Hangargekar) आयपीएलमध्ये जागा बनवली होती. आयपीएलची दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने १ कोटी ५० लाख अशी मोठी बोली लावत त्याला आपल्या संंघात विकत घेतले होते. ३० लाखांच्या मूळ किंमतीसह तो मेगा लिलावात उतरला होता. लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्सशी स्पर्धा केल्यानंतर अखेर चेन्नई त्याला संघात घेण्यात यशस्वी ठरली होती.
राजवर्धनमधील प्रतिभा आणि त्याच्यावर लागलेली मोठी बोली पाहून त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित वाटत होते. परंतु त्याला अजून आपल्या प्रदर्शनावर काम करण्याची गरज असल्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने त्याला एकाही सामन्यात खेळवले नाही. अशाप्रकारे एकही सामना न खेळताही राजवर्धनने १.५ कोटी कमावले.
डोमिनिक ड्रेक्स-
आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, एकेदिवशी त्याने संघासाठी ट्रॉफी जिंकावी. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज डॉमिनिक ड्रेक्स (Dominic Drakes) याने एकही सामना न खेळता आपल्या संघाला आयपीएल विजेता बनवले आहे. विशेष म्हणजे, त्याने २ वेळा ही विलक्षण कामगिरी केली आहे. आयपीएल २०२१ मध्ये सॅम करनचा पर्यायी खेळाडू म्हणून ड्रेक्सला संघात घेतले गेले होते. या हंगामात तो एकही सामना खेळला नव्हता. चेन्नईने या हंगामात चषक जिंकला होता. आयपीएल २०२२ मध्येही गुजरात टायटन्सने १ कोटी १० लाखांची मोठी बोली लावत त्याला संघात घेतले होते. परंतु तो एकही सामना न खेळता पुन्हा एकदा विजेत्या गुजरात संघाचा भाग बनला.
जयंत यादव-
भारताचा ऑफ स्पिनर गोलंदाज जयंत यादव (Jayant Yadav) याला आयपीएलचा बराच अनुभव आहे. तो गेल्या ६ हंगामांपासून आयपीएलचा भाग असून त्याने १९ सामनेही खेळले आहेत. मात्र आयपीएल २०२२चा पूर्ण हंगाम त्याने बाकावर बसून काढला. नवख्या गुजरात टायटन्सने १ कोटी ७० लाखांची बोली लावत त्याला विकत घेतले होते. परंतु राशिद खानसारखा अनुभवी ऑफ स्पिनर संघात असल्यामुळे जयंतला खेळण्याची संधी मिळाली नाही.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकट्या खेळाडूने नाही, तर संपूर्ण संघाने पटकावला होता ‘सामनावीर’ पुरस्कार, कसं ते घ्या जाणून
स्वत: मलिंगाने हाती घेतलंय ‘बेबी मलिंगा’ला तयार करण्याचं शिवधनुष्य, नेट्समध्ये देतोय गोलंदाजीचे धडे
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?