आपल्या सर्वांनाच माहितीये की, ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणजेच सामनावीर हा पुरस्कार सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. क्रिकेट या खेळात प्रत्येक सामन्यात हा पुरस्कार दिला जातो. मात्र, तुम्ही असं कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का? की, एका खेळाडूला नाही, तर संपूर्ण संघालाच सामनावीर पुरस्कार दिला गेला आहे. होय, क्रिकेटच्या मैदानावरही असं घडलंय. एकदा-दोनदा नाही, तर तब्बल ३ वेळा संपूर्ण संघाला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पहिल्यांदा या संघाला मिळाला होता सामनावीर पुरस्कार
‘मॅन ऑफ द मॅच’ (Man of the Match) या पुरस्काराला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ (Player of The Match) असेही म्हटले जाते. हा पुरस्कार सर्वप्रथम १९९६मध्ये जॉर्जटाऊन येथे खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात न्यूझीलंडच्या सर्व खेळाडूंना देण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज संघाला ४ धावांनी धूळ चारली होती. कमी धावसंख्या असणाऱ्या या सामन्यात ४ फलंदाजांनी धावा केल्या होत्या आणि ६ गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी न्यूझीलंड संघाने सामना जिंकणे ही जागतिक क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट मानली जात होती.
या संघांनीही पटकावलाय पुरस्कार
सन १९९६मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान संघात खेळल्या गेलेल्या एका वनडे सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. तो सामना पाकिस्तान संघाने २ विकेट्सने जिंकला होता. सामन्यात पाकिस्तानच्या प्रत्येक फलंदाजांनी धावा आणि सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या होत्या. संघाची ही शानदार कामगिरी पाहून संपूर्ण पाकिस्तान संघालाच ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला होता.
त्यानंतर १९९९मध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही संघाला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला होता. तो सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळला गेला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिज संघाला ३५१ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे संपूर्ण दक्षिण आफ्रिका संघाला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कसा होतो मॅन ऑफ द मॅचचा निर्णय?
क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करतो, तेव्हा त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार दिला जातो. दुसरीकडे, संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द सीरिज’ (Man of the Series) म्हणजेच मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कार नेमणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये सामन्याचे समालोचक, माजी क्रिकेटपटू आणि मॅच रेफ्री यांचा समावेश असतो. हे सर्व एकत्र येऊन ठरवतात की, कोणता खेळाडू ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सीरिज’ बनणार. समालोचक पूर्ण सामन्यादरम्यान प्रत्येक खेळाडूवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यांचे मतही यामध्ये मोलाचे मानले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?