आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रेक्षकांना एक थरार अनुभवाला मिळतो तसा यंदाही मिळत आहे. नेहमीप्रमाणेच यंदाच्या आयपीएलमध्येही फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये अनेक दिग्गज फलंदाज आपली शानदार फलंदाजी दाखवत आहेत.
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये शतक ठोकणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा मान युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आतापर्यंत आयपीएलमधील १२८ सामन्यात ६ शतके ठोकली आहेत.
या स्पर्धेत असेही काही फलंदाज आहेत, ज्यांना आयपीएलच्या शतकासाठी १०० पेक्षा अधिक डाव खेळायला लागले. या लेखात, आम्ही त्यातील ३ फलंदाजांविषयी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया कोण आहेत ते तीन फलंदाज.
आयपीएलमध्ये पहिल्या शतकासाठी सर्वाधिक डाव खेळलेले भारतीय खेळाडू –
३. अंबाती रायुडू – चेन्नई सुपर किंग्ज – ११९ डाव
आयपीएलमध्ये सध्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या अंबाती रायुडूने पहिले आयपीएल शतक झळकावण्यासाठी ११९ डाव खेळेल. रायडूने २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध पहिले आयपीएल शतक ठोकले होते. रायडूला आयपीएलच्या पहिल्या शतकासाठी ११९ डाव खेळावे लागले. त्या खेळीत रायडूने ६२ चेंडूत १०० धावा केल्या होत्या.
२. विराट कोहली – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – १२० डाव
या यादीतील दुसरे नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचे आहे. या यादीमध्ये ‘रनमशीन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोहलीचे नाव पाहून काही क्रिकेटप्रेमींना आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. आयपीएलमध्ये पहिल्या शतकासाठी विराटला १२० डावांची प्रतीक्षा करावी लागली. २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध विराटने आपले पहिले आयपीएल शतक केले होते. त्या मोसमात कोहलीने एकूण ४ शतके केली होती. आता त्याच्या नावावर ५ आयपीएल शतके आहेत.
१. शिखर धवन – दिल्ली कॅपिटल्स – १६७ डाव
शिखर धवन, दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत आहे. ‘गब्बर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखरला आयपीएलमधील पहिल्या शतकासाठी तब्बल १६७ डाव वाट पाहावी लागली. त्यामुळे आयपीएलमध्ये पहिल्या शतकासाठी सर्वाधिक डाव खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. धवनने या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. या हंगामात शिखरने सलग दोन शतके ठोकली आहेत, धवनने नुकतेच किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दुसरे शतक झळकावले आहे.
महत्वाच्या बातम्या –
-अखेर ३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘हा’ भारतीय दिग्गज करणार पुनरागमन
-व्हिसा मिळूनही झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत संघासोबत गेले नाही पाकिस्तानला, जाणून घ्या कारण
-शतक ठोकले पण इतिहास रचलाय हे माहिती नव्हतं, सामन्यानंतर धवनचे अचंबित करणारं वक्तव्य
ट्रेडिंग लेख –
-आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
-हमसे पंगा पडेगा मेहंगा! चौकार मार म्हणून खोड काढणाऱ्या अख्तरला सेहवागचा जबरा पलटवार