भारत विरुद्ध इंग्लंडची चार कसोटी सामन्यांची मालिका काल संपुष्टात आली. काल संपलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड संघाचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव केला. यासह चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने खिशात घातली.
खरंतर, चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून एक पाऊल पुढे टाकले होते. पहिल्या दिवशी फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा फायदा उचलत इंग्लंडचा संघ पहिल्याच डावात मोठी धावसंख्या उभारू शकत होता. मात्र त्यांच्या फलंदाजांनी मागील दोन सामन्यांप्रमाणेच हाराकिरी पत्करली. परिणामी इंग्लंड सामन्यात पिछाडीवर पडला आणि त्यानंतर भारताने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडच्या पराभवाला तीन प्रमुख गोष्टी कारणीभूत ठरल्या.
१) फलंदाजांचे अपयश –
पहिल्या डावात नाणेफेक जिंकूनही इंग्लंडला त्याचा लाभ उठवण्यात उठवण्यात अपयश आले. पहिल्या दिवशीच इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातले. त्यामुळे त्यांचा पहिला डाव अवघ्या २०५ धावांवर संपुष्टात आला. फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर ही धावसंख्या कमी असल्याचे सामन्याच्या शेवटी सिद्ध झाले. त्यामुळे इंग्लंडच्या पराभवाला प्रामुख्याने त्यांची फलंदाजी कारणीभूत ठरली.
२) गोलंदाजांनी नाही उठवला संधीचा फायदा –
इंग्लंडच्या २०५ या धावसंख्येच्या प्रत्युतरात भारतीय संघ दोनदा अडचणीत सापडला होता. एकदा ३ बाद ४१ तर एकदा ६ बाद १४६ अशा नाजूक स्थितीत भारतीय संघ होता. मात्र या संधीचा फायदा इंग्लंडचे गोलंदाज घेऊ शकले नाही. भारतीय फलंदाजांना भागीदारी उभारण्याची संधी इंग्लिश गोलंदाजांनी दिली. परिणामी पहिल्या डावातच भारतीय संघाने ३६५ धावा उभारल्या, ज्यामुळे दुसऱ्या डावात भारताला फलंदाजी करण्याचीही गरज भासली नाही.
३) चुकलेली संघनिवड –
इंग्लंडला चौथ्याही कसोटी सामन्यात खेळपट्टीचा अचूक अंदाज घेण्यात अपयश आले. फलंदाजी मजबूत करण्याच्या नादात त्यांनी केवळ तीन नियमित गोलंदाज खेळवले. ऑफस्पिनर डॉम बेस पूर्णतः प्रभावहीन ठरला. त्यामुळे अष्टपैलू बेन स्टोक्सला अतिरिक्त षटके टाकावी लागली. मात्र भारताच्या उष्ण वातावरणात तो देखील थकल्याने निष्प्रभ ठरला. वेगवान गोलंदाजाना या सामन्यात खेळपट्टीकडून मदत मिळत होती, मात्र इंग्लंडने जेम्स अँडरसनच्या रुपात केवळ एकच नियमित वेगवान गोलंदाज खेळवला. हे देखील इंग्लंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
महत्वाच्या बातम्या:
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजनपद लॉर्डस गमावणार? हे आहे कारण
INDvsENG: पंतमध्ये धोनीची आत्मा घुसली रे! त्या लाजबाव थ्रोवर सामना समालोचकही फिदा
रोहितकडून घ्यावे फलंदाजीचे धडे; इंग्लंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या विराटला या क्रिकेटपटूचा सल्ला