आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची चाहत्यांना नक्कीच आतुरता लागली असेल. दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आयपीएल 2025 साठी रिषभ पंतची (Rishabh Pant) कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. यासह, यंदाच्या आयपीएल हंगामासाठी कर्णधाराची घोषणा करणारा एलएसजी 7वा संघ बनला आहे. पण अजूनही 3 संघ आहेत, जे यंदाच्या आयपीएल हंगामासाठी आपल्या कर्णधाराच्या शोधात आहेत.
लखनऊ सुपर जायंट्सबद्दल (LSG) बोलायचे झाले तर, त्यांनी मेगा लिलावात (IPL Mega Auction 2025) रिषभ पंतला (Rishabh Pant) 27 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्याच वेळी, पंजाब किंग्जने (Punjab Kings) श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) त्यांचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. अय्यरला पंजाबने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याच्याशिवाय, मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) नेतृत्व हार्दिक पंड्याकडेच (Hardik Pandya) असणार आहे. गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) नेतृत्व यंदा शुबमन गिलकडेच (Shubman Gill) असेल.
रूतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आयपीएल 2024 मध्ये खूप चांगली कामगिरी केली. त्यामुळे यंदाही तो सीएसकेचा कर्णधार असेल. 2021 पासून राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार असलेला संजू सॅमसन (Sanju Samson) यावेळीही संघाचा कर्णधार राहील, त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानने शेवटच्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. 2024च्या आयपीएलच्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) नेणारा पॅट कमिन्स (Pat Cummins) पुन्हा हैदराबादची धुरा सांभाळू शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज- रूतुराज गायकवाड
मुंबई इंडियन्स- हार्दिक पांड्या
गुजरात टायटन्स- शुबमन गिल
लखनऊ सुपर जायंट्स- रिषभ पंत
पंजाब किंग्ज- श्रेयस अय्यर
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स
आतापर्यंत, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांनी अद्याप आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल रिषभ पंतची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
विराट कोहलीचे रणजी सामने खेळणे झाले निश्चित, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
रिषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेही झाला कर्णधार, ‘या’ संघाची धुरा सांभाळणार