आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांचे चित्र स्पष्ट झालेले दिसून येते. आगामी आयपीएलचे आयोजन कोठे करायचे? याबाबत अजूनही साशंकता असली; तरी या आयोजनस्थळांवरून वाद रंगला आहे. याबाबत तीन फ्रेंचायझींनी लेखी तक्रार केली आहे.
आयपीएल येथे होण्याची शक्यता
सुरुवातीच्या बातम्यांनुसार आयपीएलच्या सर्व साखळी सामन्यांचे आयोजन मुंबई आणि पुणे येथे करण्यात येण्याचे ठरले होते. तसेच प्ले-ऑफचे सामने अहमदाबाद येथे खेळले जाणार होते. त्यानंतर त्यामध्ये बदल करून चेन्नई, कोलकाता, दिल्ली, बेंगलोर, मुंबई व अहमदाबाद ही ठिकाणी अंतिम करण्यात आली होती. मात्र मुंबईतील सामान्यांसाठी प्रेक्षक येऊ शकत नाहीत असा आदेश आल्याने या यादीतून मुंबईला वगळण्यात आले. अशात मुंबईच्या पर्यायाचा विचार केला जात आहे.
या संघांनी व्यक्त केली नाराजी
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाच्या बातमीनुसार, आयपीएलचे सामने सहा शहरात खेळवले जात असल्याने पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संघांचा मते, ज्या शहरांमध्ये आयपीएलचे आयोजन होईल, त्याच शहरांना त्याचा फायदा मिळेल. त्यामुळे आगामी आयपीएल त्रयस्थ ठिकाणी खेळवावी जेणेकरून स्पर्धा ही निकोप होईल. याबाबतचे आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमीन यांच्याशी चर्चा देखील सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
हैदराबादने व्यक्त केली आयोजनाची इच्छा
हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिन यांनी आगामी आयपीएलचे काही सामने हैदराबाद क्रिकेट संघटना आयोजित करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. हैदराबादमध्ये कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आयपीएल आयोजित केले जाईल असे त्यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचा सुपरहिट शो! विजय हजारे ट्रॉफीत एक-दोन नव्हे ५ गोलंदाजाना थकवलं, चोपल्या ‘इतक्या’ धावा
क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा संघसहकारीही आहे यात
शुबमनवर चौथ्या कसोटीतून बाहेर होण्याची टांगती तलवार, १०० ची सरासरी असणारा खेळाडू घेणार जागा?






