fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा संघसहकारीही आहे यात

5 Players Took Up Other Profession

जगभरात काही खेळांना खूप महत्त्व दिले जाते, त्यातील एक म्हणजे क्रिकेट होय. क्रिकेटला जगभरातील चाहते केवळ खेळ समजत नसून एक भावनाही समजतात. परंतु अनेक वेळा असे होते की, सुरुवातीला त्या खेळाडूला वाटते की, तो मोठा क्रिकेटपटू होऊ शकतो. परंतु काही काळानंतर त्याला समजते की, आपल्याला इतर व्यवसायात कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अशी बरीच उदाहरणं आहेत. या लेखात आपण त्या क्रिकेटपटूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी क्रिकेट तर खेळले. परंतु नंतर क्रिकेट सोडून इतर व्यवसायात पाऊल टाकून यश प्राप्त केले.

या ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी क्रिकेट सोडून स्विकारला दुसरा व्यवसाय- 5 Players Took Up Other Profession

१. सलील अंकोला (अभिनेता)

भारतीय संघाचा माजी खेळाडू सलील अंकोला (Salil Ankola) आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून दुसरा व्यवसाय स्विकारणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. खरंतर त्याने १९८९मध्ये क्रिकेट जगतात पाऊल ठेवले होते. त्यावेळी भारतीय संघात मोहम्मद अझरूद्दीन, कपिल देव यांसारखे दिग्गज खेळाडू खेळत असायचे.

यानंतर अंकोलाने १९९९पर्यंत १ कसोटी सामना आणि २० वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ६ आणि वनडेत ३४ धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत २ तर वनडेत १३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर त्याने १९९९मध्ये सिने जगतात पाऊल ठेवले. खरंतर अंकोला उंच खेळाडू व देखणा होता. त्यामुळे त्याला अभिनयाच्या दुनियेत लवकरच काम मिळाले होते.

अंकोलाने १९९९मध्ये टी.व्ही. शो ‘चाहत और नफरत’ मधून सुरुवात केली. यानंतर तो कुरुक्षेत्रमध्ये दिसला. सलील टी.व्ही. शो आणि चित्रपटांव्यतिरिक्त टी.व्हीच्या अनेक रियल्टी शोजमध्येही काम केले आहे. त्यामध्ये खतरों के खिलाड़ी सिझन १, पावर कपल, बिग बॉस सिझन आणि इतर गोष्टींचाही समावेश आहे.

२. ओमारी बँक्स (गायक)

वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ओमारी बँक्सचादेखील (Omari Banks) त्या खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्यांनी क्रिकेटनंतर दुसरा व्यवसाय निवडला. तो व्यवसाय म्हणजे गाण्याचा (सिंगिंग). ओमारीने विंडीज संघाकडून २००३मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ विकेट्स चटकावल्या होत्या आणि ५६ धावा केल्या होत्या.

त्याने कसोटीत आणि वनडेत अनुक्रमे १० आणि ५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३१८ धावा आणि वनडेत ८३ धावा केल्या आहेत. एकूण १५ सामने खेळल्यानंतर ओमारीला त्याच्या खराब फॉर्मनंतर संघातून वगळण्यात आले होते.

तरीही त्याने काऊंटी क्रिकेट खेळणे सुरुच ठेवले. परंतु कलेच्या दुनियेकडे तो अधिक आकर्षित झाला आणि त्याने २०११मध्ये क्रिकेट सोडून संगीतामध्ये आपली कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. एक व्यावसायिक गायक म्हणून त्याचे पहिले गाणे हे ‘मूव्ह ऑन’ असे होते.

३. तातेंदा तैबु (चर्च ड्यूटी)

झिंबाब्वे क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज तातेंदा तैबुने (Tatenda Taibu) आपल्या राष्ट्रीय संंघाचे प्रतिनिधित्व दीर्घकाळापर्यंत केले. परंतु त्याने पुढे क्रिकेटसोडून चर्चमध्ये काम (चर्च ड्यूटी) करण्याचा निर्णय घेतला. तैबुने २००१मध्ये कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

यानंतर यष्टीरक्षक फलंदाज तैबुने झिंबाब्वेकडून २८ कसोटी, १५० वनडे आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १५४६, वनडेत ३३९३ आणि टी२०त २५९ धावा केल्या आहेत.

जवळपास १२ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर तैबुने २०१२मध्ये क्रिकेटपासून दूर होऊन भगवंताला शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्याने २०१२नंतर क्रिकेटचा एकही सामना खेळला नाही आणि चर्चमध्ये काम करण्याच सुरुवात केली.

४. जफर अंसारी (वकील)

इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटने राष्ट्रीय संघाला अनेक खेळाडू दिले आहेत. जाफर अंसारीने (Zafar Ansari) २०११मध्ये केविन पीटरसनला बाद करत चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर अष्टपैलू क्रिकेटपटू अंसारीने आपल्या संघाचा नियमित खेळाडू बनला होता.

त्याला प्रतिक्षेचे बक्षीस मिळालं आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवडकर्त्यांनी अंसारीला आपल्या संघात सामील केले होते. तसेच २०१५मध्ये त्याने आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आपले पदार्पण केले. २०१६मध्ये भारतीय दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा सदस्य अंसारी फीट नसल्यामुळे सुरुवातीचे दोनच सामने खेळू शकला.

त्यानंतर त्याने आपल्या देशांतर्गत सरे संघासाठी केवळ २ सामने खेळले आणि त्यानंतर अचानक निवृत्तीची घोषणा केली. तो आपल्या विधानावर खरा ठरला. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, क्रिकेट हे त्याच्या आयुष्याचा केवळ एक भाग होता. कारण त्याने केवळ ४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर अंसारीने क्रिकेट सोडून कायद्याच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि तो वकील झाला.

५. जॉर्ज थॉमस (सर्जन)

क्रिकेट जगतात वन मॅच ‘वंडर खेळाडू’ हा एक शब्द आहे, जो ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जॉर्ज थॉमसने आपल्या कारकीर्द चांगल्याप्रकारे घडवली आहे २१ व्या वयात थॉमसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि ६ वर्षांनंतर त्याला राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास बोलावले होते.

जॉर्जने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळताना १९५२मध्ये पदार्पण केले होते. त्यामध्ये त्याने सिडनीच्या कठीण खेळपट्टीवर ४४ धावा केल्या होत्या. त्याचा पहिला सामना हाच शेवटचा सामना बनला होता.

त्यानंतर डावखुरा फलंदाज जॉर्जने विक्टोरियाकडून क्रिकेट खेळले आणि १९ सामन्यात ११०० धावा केल्या. यानंतर जॉर्जने वैद्यकीय क्षेत्रात आपली कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने स्त्री रोग विशेतज्ज्ञ म्हणून काम सुरु केले. त्याने ७० च्या दशकाच्या मध्यात ऑस्ट्रेलियामध्ये लेजर सर्जरीदेखील सुरु केली आणि एक यशस्वी सर्जन बनला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक

-जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…

-बापरे! फक्त २ भारतीय खेळाडूंना घेऊन ‘या’ दिग्गजाने तयार केली ‘आयपीएल ऑलटाईम ११’

You might also like