मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज तिसरा आणि शेवटचा वनडे सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकात 230 धावांवर संपूष्टात आला आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी 231 धावांचे आव्हान आहे.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने अर्धशतक केले आहे. त्याने 74 चेंडूत त्याचे हे वनडे क्रिकेटमधील 70 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. याबरोबरच त्याने या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतकही पूर्ण केले आहे.
तसेच त्याची ही एका वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके करण्याची तिसरीच वेळ ठरली आहे. त्याने याआधी 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्येच एका वनडे मालिकेत 69,78*,50* असे सलग तीन अर्धशतके केली होती. त्यानंतर त्याने 2014 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंमध्येच एका वनडे मालिकेत 56,50,79* असे सलग तीन अर्धशतके केली होती.
यानंतर आता 4 वर्षांनी धोनीने पुन्हा हा कारनामा केला आहे. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात 51 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 55 धावा केल्या होत्या.
धोनीने या सामन्यात 1000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे.
धोनीने या सामन्यात भारतीय कर्णधार विराट बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची रचली आहे. मात्र झे रिचर्डसनने विराटला 46 धावांवर बाद करत ही जोडी तोडली.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीने भारताच्या या दिग्गजाचाही विक्रम टाकला मागे, आत्ता फक्त सचिन तेंडुलकर आहे पुढे
–कोहली, तेंडुलकर प्रमाणे एमएस धोनीनेही केला ऑस्ट्रेलियामध्ये ‘तो’ कूल विक्रम
–१५ वर्षांनंतर चहलमुळे ऑस्ट्रेलियन भूमीत घडला बाप योगायोग