टी-२० क्रिकेट आज जगभरात लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या या वेगवान प्रकारातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००५ साली खेळविण्यात आला होता. २००७ साली दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढायला लागली. या विश्वचषकानंतर अनेक फ्रँचायझी लीगची सुरुवातही जगभरात झाली होती.
या लीगमधून अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध करत राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. मात्र, आजच्या लेखात आपण अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी टी-२० प्रकारात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर ते स्वतःला सिद्ध करू शकले नाहीत.
१. मायकेल क्लिंजर
सन १९९० मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लिंजरने टी-२० सामन्यांत दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने खेळलेल्या एकूण २०६ सामन्यांत ३४.४५ च्या सरासरीने ५९६० धावा काढल्या आहेत. यासह त्याच्या स्ट्राईक रेट १२३ असा समाधानकारक होता. हे आकडे त्याच्या प्रतिभेची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत. २०१४-१५ च्या बिग बॅश लीग स्पर्धेत मायकेलने पर्थ स्कॉचर्स संघासाठी ३२६ धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान पटकावला होता. २०११ सालच्या आयपीएल लिलावात कोची टस्कर्स संघाने त्याला संघात समाविष्ट करून घेतले होते. परंतु केवळ चारच परदेशी खेळाडू संघात खेळवण्याचा नियम असल्याने त्याला फारसे सामने खेळता आले नाही.
मायकेलच्या टी-२० आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीनंतरही त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी संधी मिळाली नाही.
२. हेन्री डेविड्स
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेन्री डेविड्सने २००९ सालच्या टी-२० चॅम्पियन्स लीग स्पर्धेत केप कोब्राज संघासाठी उत्तम कामगिरी केली होती. केप कोब्राज संघाच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. हेन्रीने १८३ टी-२० सामन्यांत २४ च्या सरासरीने आणि १२५.०८ च्या स्ट्राईक रेटने ३८६५ धावा काढल्या आहेत. परंतु ९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत संधी मिळाल्यावर त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. या ९ सामन्यांत त्याने १७.८८ च्या सरासरीने केवळ १६१ धावा काढल्या.
परंतु हेन्रीने क्लब क्रिकेटमध्ये आपले सातत्य कायम राखले. २०१४-१५ साली कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना त्याने ७ सामन्यांत १५६ धावा काढल्या. त्याचे आकडेच त्याच्या प्रतिभेची खात्री पटवतात.
३. रजत भाटिया
रजत भाटिया भारताच्या देशांतर्गत क्रिकेट वर्तुळातील अतिशय परिचित नाव आहे. अष्टपैलू रजत भाटिया उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी करत असे. प्रथमश्रेणी क्रिकेटसह टी-२० क्रिकेटमध्येही त्याने लक्षणीय यश मिळविले आहे. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली डेयरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांकडून सामने खेळले आहेत. आयपीएलच्या एकूण ९५ सामन्यांत त्याने ७१ बळी मिळविले. टी-२० सामन्यांत ७ ते १५ षटकांच्या दरम्यान गोलंदाजी करतांना हमखास बळी मिळविणे, हे त्याचे वैशिष्ट्य होते. फलंदाजीतही तो सातव्या क्रमांकावर येऊन संघासाठी उपयुक्त योगदान देत असे. मात्र, त्यालाही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्याची फारशी संधी मिळाली नाही.
ट्रेंडिंग लेख-
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी
मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन
महत्त्वाच्या बातम्या-
एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट
“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”
मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट






