युएईमध्ये येत्या १९ सप्टेंबर पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने रंगणार आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर १९ ऑक्टोबर पासून ते १४ नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहे.
तसेच बीसीसीआयने ही आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी बुधवारी (८ सप्टेंबर) १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला होता.दरम्यान भारतीय निवडकर्ते चेतन शर्मा यांनी ३ असे निर्णय घेतले आहेत, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
१)हार्दिक पंड्याला मिळाले संघात स्थान :
नुकताच भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यावर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. तरीदेखील त्याची टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम १५ खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. दरम्यान, सामना जिंकवून देणाऱ्या खेळाडूंना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.
हार्दिक पंड्या आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी आणि विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु, दुखापतीतून बाहेर आल्यानंतर तो गोलंदाजी करताना अधिकवेळा दिसून येत नाही. तसेच फलंदाजी करताना देखील तो संघर्ष करताना दिसून येत आहे. तरीदेखील त्याला या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.
२) अक्षर पटेलला संघात संधी :
डाव्या हाताचा फिरकीपटू अक्षर पटेलची टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या संघात रविंद्र जडेजाच्या रुपात डाव्या हाताचा फिरकीपटू असताना देखील अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. तसेच भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या युजवेंद्र चहलला देखील या संघात स्थान देण्यात आले नाहीये.
युजवेंद्र चहलने ४९ टी -२० सामन्यात ८.३२ च्या इकोनॉमिने ६३ गडी बाद केले आहेत. त्याने गेल्या काही महिन्यांपासून चांगली कामगिरी केली आहे. तरीदेखील निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत अक्षर पटेलला या संघात स्थान दिले आहे.
३) भारतीय संघात ५ फिरकी गोलंदाजांची निवड :
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडकर्त्यांनी घेतलेला तिसरा सर्वात आश्चर्यकारक निर्णय म्हणाजे, एकाच संघात ५ फिरकी गोलंदाजांना संधी देणं. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी या संघात आर अश्विन, राहुल चाहर,वरूण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संधी दिली आहे. तर वेगवान गोलंदाजीचा भार मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे.
दरम्यान, हे वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाले तर, भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून राखीव खेळाडू म्हणून दोन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकालाठी भारतीय संघात स्थान न देणे ठरू शकते घोडचूक
टी-२० विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघाची घोषणा; ४१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूला दिले स्थान






