एलजीबीटी कम्युनिटी हा आता भारतीयांसाठी नवा विषय राहिलेला नाही. जगभरात या गोष्टीला आता समाजमान्यताही मिळू लागलेली आहे. क्रिकेट क्षेत्रही यापासून दुर राहिलेलं नाही. क्रिकेटमध्ये अनेक महिला क्रिकेटपटू अशा आहे ज्यांनी महिला क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे व आपण समलिंगी असल्याचा स्विकारही केला आहे.
या लेखात आपण अशाच काही खेळाडूंची माहिती करुन घेणार आहोत.
३. एलेक्झांड्रा जाॅय ब्लॅकवेल व लिस्नेय अस्केव:
१५ वर्ष क्रिकेट खेळलेल्या एलेक्झांड्रा जाॅय ब्लॅकवेल यांनी २००३ ते २०१७ या काळात ऑस्ट्रेलियाकडून तब्बल २७१ सामने खेळले आहेत. एक चांगल्या फलंदाज खेळाडू म्हणून ओळख असलेल्या एलेक्झांड्राने कसोटीत ४४४, वनडेत ३४९२ तर टी२०मध्ये १३१४ धावा केल्या आहेत. तिने ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्त्वाची धुराही वाहिली आहे. तसेच २०१७मध्ये तिने क्रिकेटला अलविदा केला.
आपण समलिंगी असल्याचे तिने २०१३मध्ये घोषीत केले. तसेच क्रिकेट कारकिर्द सुरु असतानाच समलैगिंक असल्याची घोषणा करणारी ती जगातील केवळ दुसरी क्रिकेटपटू ठरली होती. २०१५मध्ये तिने इंग्लंडच्या लिस्नेय अस्केवबरोबर लग्न केले. त्या दोघींची तब्बल ८ वर्ष मैत्री होती. त्याकाळी ऑस्ट्रेलियामध्ये समलैंगिकता स्विकारली जात नव्हती. परंतु, पुढे २०१७मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याला पाठिंबा दिला. लिस्नेय अस्केवने इंग्लंडकडून ८ वनडेत ६ विकेट व १२० धावा तर टी२०मध्ये ६ विकेट्स घेतल्या आहेत.
२. एमी सॅटर्थवेट व ली ताहुहु:
न्यूझीलंडकडून एमी सॅटर्थवेटकडून १३४ वनडे व १११ टी२० सामने खेळली आहे. तिने वनडेत ४३६१ धावा व ४६ विकेट्स, तर टी२०मध्ये १७८४ धावा व २६ विकेट्स घेतल्या आहे. दुसऱ्या बाजूला ली ताहुहु ही देखील न्यूझीलंडकडून ७६ वनडे व ६१ टी२० सामने खेळली आहे. त्यात तिने वनडेत ८३ तर टी२०मध्ये ५३ विकेट्स घेतल्या आहेत.
या दोनही खेळाडू माध्यमे किंवा लोकांपासून सतत दुर राहिल्या. परंतु जेव्हा त्यांनी २०१७मध्ये लग्न केले तेव्हा मात्र क्रिकेट विश्वात त्याची जोरदार चर्चा झाली. त्या दोघीही न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या कायमच महत्त्वाच्या सदस्य राहिल्या आहेत. त्या दोघीही जरी २१व्या शतकात क्रिकेट खेळत असल्या तरी सोशल माध्यमांवर फारशा नाहीत. तसेच त्या आपल्या नात्याबद्दलही फारसे बोलत नाही. त्या थोडीफार समाजसेवाही करतात.
१. डेन वॅन निकर्क आणि मरझीन केप:
दक्षिण अफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन वॅन निकर्कने तिची संघ सहकारी असलेली अष्टपैलू मरझीन केपशी ८ जुलै २०१८ रोजी विवाह केला. २००९ साली विश्वचषका दरम्यान या दोघींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
डेन वॅन निकर्क आणि मरझीन केप या दोघींची क्रिकेट कारकिर्दही बरोबरीने बहरली आहे. दोघींची क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे. डेन वॅन निकर्क एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३८ बळी मिळवले आहेत. ती दक्षिण अफ्रिकेसाठी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर मरझीन केप १३४ बळी घेत या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
तर दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादित वॅन निकर्क २१७५ धावांसह चौथ्या स्थानी आहे. मरझीन केपनेही २०१७ धावा करुन सहावे स्थान मिळवले आहे. दोघींही २०२० टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाच्या सदस्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
एकूण खेळाडू २०४ आणि करोडोंची खैरात! असा राहिला आयपीएलचा मेगा ऑक्शन
यंदाचा महागडा खेळाडू ठरताच ‘इशान किशन’ लागला नाचू, ‘झिंगाट’वर केला भन्नाट डान्स