पुणे: वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या (वायफा) आंतर जिल्हा खुल्या फुटबॉल स्पर्धेत ३४ जिल्हा संघांनी सहभाग निश्चित केला आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा उद्या बुधवारपासून (ता. १४) सुरु होणार आहे.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने तीन वर्षांनी ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये अखेरची स्पर्धा झाली होती. गेल्या स्पर्धेत पुणे संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तेथे त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. आता घरच्या मैदानावर खेळताना पुणे संघ आपल्या कामगिरीत सुधारण्याचा प्रयत्न करेल. मुंबई, गतविजेते कोल्हापूर आणि नागपूर असे अन्य तुल्यबळ संघ सहभागी झाले आहेत.
सात दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील सामने बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे मानद सचिव प्रदीप परदेशी म्हणाले, ‘वायफाच्या या प्रमुख स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्व जिल्हा संघटनांकडून मिळालेला प्रतिसाद उत्तम आहे. क्रीडा संकुलातील दोन मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.’ प्रत्येक मैदानावर पहिले तीन दिवस चार, त्यानंतर उपांत्य फेरी आणि नंतर एका दिवसाच्या विश्रांतीने अंतिम सामना असे एकूण ३३ सामने खेळविले जाणार आहे.
वायफाचे कोषाध्यक्ष आणि पुणे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी म्हणाले, अभिजित दादा स्मृीत फौंडेशन, द्रुवा, ओमटेक्स अशा सर्व समर्थकांचे आम्ही आभारी आहेत. सिटी एफसी पुणे, अॅस्पायर इंडिया, गेम ऑफ गोल, रायन स्पोर्ट्स या संघांनी स्वतःहून पुढे येत स्पर्धेच्या आयोजनातील जबाबदारी स्विकारली. क्रीडा आयुक्कांनी देखिल स्पर्धेच्या आयोजनासाठी मैदाना उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली. यामुळे खेळाडूंना सर्वोत्तम दर्जाच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळेल.
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांच्या हस्ते, वायफाचे उपाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघटनेने आपला २० सदस्यीय संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व श्रीकांत मोलानगिरीकडे सोपविण्यात आले आहे. पुणे जिल्हा संघाची सलामीची लढत १५ डिसेंबरला बीडविरुद्ध होणार आहे.
पुणे जिल्हा संघ – गोलरक्षक – शिवम पेडणेकर, श्रीहरी जाधव, बचावपटू – फिलिप देसा, हर्षद गावंडे, स्वतेज वनकुद्रे, तुषार देसाई, सिद्धांत प्रणय, ग्लेन रेबेलो, रुतविज वेलाग, जीवन रावत, मध्यरक्षक – आयुष दीपक, श्रीकांत मोलानगिरी, हृतिक पाटील, नरसिंहा मगम, शिवराज पाटील, आक्रमक – सुमित भंडारी, सतीश हवालदार, प्रतीक पाटील, हृषिकेश खेडेकर, सुधीश एम., राखीव – हर्ष उत्तेकर, सूरज सिंग, योगेश रावत, मुख्य प्रशिक्षक – राज मोरे, व्यवस्थापक – आलोक शर्मा
———–
गुरुवारचे सामने – नाशिक वि. गडचिरोली (स. ८.३०), नांदेड वि. अमरावती (स. १०.३०), सिंधुदुर्ग वि. परभणी (द. १ वा.), नंदुरबार वि. लातूर (दु. ३.३०)
मैदान २ ः औरंगाबाद वि. गोंदिया (द. ८.३०), रायगड वि. पालघर (स. १०.३०), नगर वि. ठाणे (द. १ ), उस्मानाबाद वि. वाशिम (दु. ३.०० वा.) (34 districts will play in inter-district football tournament, organized in Pune after three years)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023: ‘मिनी ऑक्शन’साठी अंतिम यादी तयार! इतक्या खेळाडूंवर लागणार बोली; इंग्लंडचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बांगलादेशचा कर्णधारही पहिल्या कसोटीला मुकणार? सामन्याच्या 24 तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल