---Advertisement---

तो फलंदाज तीन तासांत दोनदा झाला बाद, भारतीय गोलंदाजांनी केला अजब कारनामा

On: सोमवार, ऑक्टोबर 21, 2019 2:41 PM
---Advertisement---

रांची | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिका पराभवाच्या छायेत आहे. त्यांचे फाॅलऑननंतरही २२ धावांत ४ फलंदाज तंबूत परतले आहेत.

यातील झुबेर हाजमा हा फलंदाज केवळ ३ तासांच्या आत दोनवेळा बाद झाला. आफ्रिकेच्या पहिल्या डावात चौथ्या बळीच्या रुपात हामजाची विकेट गेली होती. तो बरोबर सकाळी ११ वाजून २ मिनीटांनी बाद झाला होता. त्याला पहिल्या डावात ६२ धावांवर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केले.

त्यानंतर आफ्रिकेला दुपारी १ वाजून ३६ मिनीटांनी फाॅलोऑन मिळाला. त्यानंतर दुपारी बरोबर २ वाजता त्याला शमीने शुन्य धावेवर त्रिफळाचीत केले.

यामुळे केवळ तीन तासांत दोनदा हामजाला तंबूचा रस्ता धरावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---