---Advertisement---

बापरे! ४ दिवसात रंगल्या तब्बल ३ सुपर ओव्हर…

On: शनिवार, फेब्रुवारी 1, 2020 4:41 PM
---Advertisement---

काल (31 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली. विशेष म्हणजे या मालिकेत सलग दुसऱ्यांदा भारताने सुपर ओव्हमध्ये विजय मिळवला.

या टी20 मालिकेत 29 जानेवारीला तिसऱ्या सामन्यातही बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर झाली होती. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला होता.

त्यानंतर आता आज(1 फेब्रुवारी) महिला तिरंगी टी20 मालिकेत पार पडलेल्या इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील सामन्यातही सुपर ओव्हर झाली. या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला.

आज कॅनबेराला झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 बाद 156 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही निर्धारित 20 षटकात 8 बाद 156 धावा केल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया महिला संघाला बिनबाद 8 धावाच आल्या. त्यामुळे विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडला 9 धावांचे आव्हान होते. हे आव्हान इंग्लंड महिला संघाने 4 चेंडूत पूर्ण करत सामना जिंकला.

त्यामुळे तब्बल 4 दिवसात 3 सुपर ओव्हर झालेले सामने चाहत्यांना पहायला मिळाले आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात असे रंगली सुपर ओव्हर – 

सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी20 मालिकेतील तिसरा आणि चौथ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच झाले की मालिकेतील सलग दोन सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.

या मालिकेतील 29 जानेवारीला झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघाला निर्धारित 20-20 षटकानंतर प्रत्येकी 179 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा करत भारताला 18 धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून 20 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.

त्यानंतर 31 जानेवारीला झालेल्या चौथ्या टी20 सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघाने निर्धारित 20-20 षटकात प्रत्येकी 165 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये हा सामना गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी 1 बाद 13 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 14 धावांचे आव्हान होते.

भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने (KL Rahul) सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केली. यावेळी भारताकडून केएल राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे भारताला शेवटच्या चार चेंडूत 4 धावांची गरज होती.

पण तिसऱ्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---