भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 19 सदस्यासोबत ऑस्ट्रेलियाला गेला आहे. या 19 पैकी 4 खेळाडू असे आहेत, ज्यांना या मालिकेत एका ही सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकणार नाही.
1.पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉला रोहित शर्माच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत सलामी फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु न्यूझीलंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या चार डावात सपशेल अपयशी ठरला होता.
अशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता फार धुसर आहे. कारण भारतीय संघाकडे सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा, मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांच्या रूपाने तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पृथ्वीला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
2. केएल राहुल
केएल राहुलचा भारतीय कसोटी संघात खूप कालावधीनंतर समावेश करण्यात आला आहे. परंतु भारतीय संघात पाचव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून त्याला स्थान देण्यात आले. त्याचबरोबर जर त्याच्या यष्टीरक्षण कौशल्याबददल बोलायचे झाले, तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची तिसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
सलामी फलंदाज म्हणून त्याची संघात जागा निर्माण होताना दिसत नाही. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघ व्यवस्थापक केएल राहुलच्या आधी वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यावर पहिल्यांदा विश्वास दाखवला जाईल. अशात स्पष्टपणे म्हटले जात आहे की, तो पाणी पुरवण्याचे काम करताना दिसून येवू शकतो.
3. कुलदीप यादव
ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारतीय संघ एका फिरकीपटूबरोबर उतरू शकतो. त्यामुळे अशात भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवला संधी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. भारतीय संघाकडे अगोदरच आर अश्विन आणि रवींद्र जडेजा उपलब्ध असल्याने त्यांच्या अगोदर कुलदीप यादवला संघात स्थान देण्याची शक्यता कमी दिसून येते. त्यामुळे यादव शिवाय अश्विन आणि जडेजाला पहिल्यांदा संधी मिळेल. त्यामुळे चार सामन्यात कुलदीप फक्त बघ्याची भूमिका पार पाडताना आढळून येवू शकतो.
4. मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज हा भारतीय संघात कसोटी मालिकेसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची आशा खूपच कमी आहे. कारण भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराह, मोहमद शमी, उमेश यादवसारखे अनुभवी वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत.
जर यापैकी कोणत्या गोलंदाजांना दुखापत झाली, तर संघ व्यवस्थापन संघात नवदीप सैनीला पहिली पसंती दिली जाऊ शकते. त्यामुळे मोहम्मद सिराजला प्रतीक्षा करावी लागू शकते. सिराजकडे सराव सामन्यात चांगले प्रदर्शन करून प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यामध्ये ही तो अपयशी ठरला. त्यामुळे तो या मालिकेत पाणी पुरवण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“इशांत शर्माची ‘ही’ खासियत, म्हणूनच भारतीय संघ त्याला शंभर टक्के मिस करेल”
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
दुःखद! ‘या’ महान क्रिकेटपटूला झाला पितृशोक, आजारपणामुळे वडिलांचे निधन