भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश आहे. क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या प्रदर्शनाचा चाहत्यांच्या मनावर खुप परिणाम होतो. जेव्हा एखाद्या क्रिकेटपटूच्या दमदार प्रदर्शनामुळे संघ सामना जिंकतो, तेव्हा चाहते त्या क्रिकेटपटूची मनभरुन प्रशंसा करतात. पण जर त्याच क्रिकेटपटूच्या खराब प्रदर्शानमुळे संघाने सामना गमावला, तर चाहते त्या क्रिकेटपटूच्या आधीच्या कामगिरीला विसरुन जाऊन, त्याच्यावर टीका करतात.
अनेकांसाठी क्रिकेटपटू हे त्यांचे आदर्श असतात. लोक त्या क्रिकेटपटूच्या वैयक्तिक जीवनाचे अनुसरण करण्याचा प्रयत्नदेखील करतात. थोडक्यात, क्रिकेटपटू त्यांच्या खेळण्याबरोबरच त्यांच्या वागण्यातूनही चाहत्यांच्या मनावर अधिक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या प्रत्येक गोष्टीकडे मीडियापासून चाहत्यांपर्यंत सर्वांचे लक्ष असते.
भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू दारुचे किंवा इतर व्यसन करताना दिसले आहेत. काही दिवसांपुर्वी एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या स्मोकिंग करताना दिसला होता. असे असले तरी, भारतीय संघात अनेक असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही दारु किंवा स्मोकिंग असे कोणत्याही प्रकारचे व्यसन केलेले नाही.
या लेखात, अशाच ४ सज्जन भारतीय क्रिकेटपटूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी कधीही व्यसन केले नाही. (4 Indian Players Who Never Take Alcohol Or Smoke) –
भुवनेश्वर कुमार-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ज्याच्या स्विंग गोलंदाजीची पूर्ण जगभरात चर्चा होते, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. भारतीय संघाच्या या गोलंदाजाने आतापर्यंत भारताकडून २१ कसोटी सामने खेळत ६३ विकेट्स चटकावल्या आहेत. तर, ११४ वनडे सामन्यात त्याने १३२ विकेट्स आणि ४३ टी२० सामन्यात ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
भुवी नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज वैयक्तिकदृष्ट्या खूप साध्या आणि सरळ स्वभावाचा आहे. त्याने आजपर्यंत कधीही दारु किंवा स्मोकिंग असे कोणत्याही प्रकारचे व्यसन केलेले नाही.
राहुल द्रविड-
‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हा खूप शांत स्वभावाचा खेळाडू आहे. आपल्या दमदार प्रदर्शनाने कसोटी क्रिकेटमध्ये आपले नाव गाजवणाऱ्या द्रविडचे लाखो चाहते आहेत. केवळ सामन्य व्यक्ती नव्हे तर कित्येक क्रिकेटपटूंचा तो आदर्श आहे.
४७ वर्षीय द्रविडने आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात एकदाही दारुला हात लावला नाही. त्याला स्मोकिंग किंवा इतर कशाही प्रकारचे व्यसन नाही.
द्रविडने त्याच्या १६ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिले होते. द्रविडने भारताकडून १६४ कसोटी सामने खेळत १३२८८ धावा केल्या होत्या. तर, ३४४ वनडे सामने खेळत १०८८९ धावा केल्या होत्या. तर, त्याने टी२० क्रिकेट कारकिर्दीत एकमेव सामना खेळत ३१ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याने एकूण ४८ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली होती.
गौतम गंभीर-
भारताचा माजी डावखुरा फलंदाज गौतम गंभीर याचे कधीही व्यसन न करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत नाव येते. स्टारसनफोल्ड. कॉम वर गंंभीरने सांगितले होते की, त्याचा दारु आणि स्मोकिंगशी दूर दूरपर्यंत संबंध नाही. त्याने कधीही कशाप्रकराचाही नशा केला नाही.
गंभीरने भारताकडून २००३ ते २०१६ दरम्यान संघाकडून क्रिकेट खेळले होते. दरम्यान त्याने १४७ वनडे सामने खेळले होते. त्यात त्याने ११ शतकांच्या मदतीने ५२३८ धावा केल्या होत्या. तर, ५८ कसोटी सामन्यात ९ शतकांच्या मदतीने ४१५४ धावा केल्या होत्या. टी२० क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामने खेळत ९३२ धावा केल्या होत्या. गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारण क्षेत्र निवडले.
परवेज रसूल-
भारताकडून केवळ २ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या परवेज रसूलने त्यांच्या आयुष्यात कधीही दारु किंवा स्मोकिंगला हाथदेखील लावला नाही. जम्मू-काश्मिरचा परवेज हा भारतीय संघाचा भाग होता. परंतु, त्याला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही.
परवेजने भारातकडून केवळ १ वनडे आणि १ टी२० सामना खेळला आहे. दरम्यान त्याने वनडेत २ आणि टी२०त १ विकेट आपल्या नावावर केली होती. असे असले तरी, परवेजची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी प्रशंसनीय आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८२ सामन्यात अष्टपैलू भूमिका निभावत ४८०७ धावा आणि २६६ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-निवृत्तीनंतर आता या ५ क्षेत्रात दिसू शकतो एमएस धोनी
-भारतीय संघासाठी या ३ टी-२० सामन्यात सुरेश रैना होता कर्णधार
-आयपीएल२०२० : आरसीबीच्या या ३ खेळाडूंना कदाचित मिळणार नाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी
महत्त्वाच्या बातम्या –
-विराट कोहलीचे आरसीबीचे कर्णधारपद जाणार?, संघ मालकाने दिली प्रतिक्रिया
-आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात सचिनच्या संघावर ठरला होता धोनीचा संघ भारी