क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांच्या नावावर असे निराशाजनक रेकाॅर्ड्स आहेत. जे त्यांना आता नकोसे वाटत असतील. तत्पूर्वी बऱ्याच वेळा वेगवान गोलंदाज अतिरिक्त वेग मिळवण्याच्या प्रयत्नात किंवा फलंदाजांचा लय बिघडवण्याच्या प्रयत्नात नो-बॉल टाकतात. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अनेक गोलंदाजांनी एका सामन्यात 30 किंवा त्याहून अधिक नो-बॉल टाकले आहेत. या बातमीद्वारे आपण अशा गोलंदाजांविषयी जाणून घेऊया.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक नो-बॉल (NO-BALL) टाकण्याचा रेकाॅर्ड इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज बॉब विलिसच्या नावावर आहे. 1981 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एजबेस्टन कसोटीच्या दोन्ही डावात एकूण 34 नो-बॉल टाकले होते. तर पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) 32 नो-बॉल टाकले आहेत आणि श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज चामिंडा वासने एका कसोटीत 30 नो-बॉल टाकले आहेत.
विलिसनंतर एका कसोटीत सर्वाधिक नो-बॉल टाकण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या पॅट्रिक पॅटरसनचे नाव येते. तो गोलंदाजीमध्ये चांगला वेग गाठण्यात यशस्वी ठरला. मात्र, या प्रयत्नात पॅटरसनने अनेकदा आपली दिशा गमावली आणि नो-बॉलही टाकले. डिसेंबर 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत त्याने 33 नो-बॉल टाकले. पॅटरसनने 1986 ते 1993 दरम्यान वेस्ट इंडीजसाठी 28 कसोटी सामने खेळले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 93 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
उर्वरित आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ‘हे’ 3 रेकाॅर्ड्स मोडणे कोहलीसाठी अशक्य
भारताच्या खात्यात दुसरं सुवर्णपदक; स्टार बॅडमिंनपटूची कमाल! लवकरच मेडलची बेरीज दुहेरी अंकात?