---Advertisement---

आयपीएल 2025 पूर्वी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते सनरायझर्स हैदराबाद, लिस्टमध्ये दोन युवा भारतीय खेळाडूंचाही समावेश

---Advertisement---

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या या हंगामात चमकदार कामगिरी केली. मात्र संघाचं विजेतेपद हुकलं. अंतिम सामन्यात कोलकातानं हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला.

आता आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना त्यांचे खेळाडू रिलिज करावे लागतात, संघ फक्त आपल्या चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादची टीम आयपीएल 2025 साठी कोणते खेळाडू कायम ठेवू शकते, हे जाणून घ्या.

(1) पॅट कमिन्स – हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली. कमिन्सनं अनेकवेळा आपल्या अचूक निर्णयांनी संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सनं आयपीएल 2024 च्या 16 सामन्यांत 18 विकेट घेतल्या. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. अशा परिस्थितीत, फ्रँचायझी मेगा लिलावापूर्वी त्याला कायम ठेवू शकते.

(2) अभिषेक शर्मा – आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या अभिषेक शर्मानं आपल्या झंझावाती फलंदाजीनं सर्वांना चकित केलं आहे. या हंगामात अभिषेकनं 42 षटकार ठोकले. आयपीएल 2024 मध्ये अभिषेक शर्मानं 204.22 च्या स्ट्राईक रेटने 484 धावा केल्या. त्याची दमदार कामगिरी लक्षात घेता फ्रँचायझी त्याला कायम ठेवू शकते.

(3) हेनरिक क्लासेन – दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन हा टी20 क्रिकेटमधील एक विशेषज्ञ फलंदाज मानला जातो. क्लासेनचं वैशिष्ट्य म्हणजे तो वेगवान गोलंदाजांप्रमाणेच फिरकीपटूंविरुद्धही तितकीच आक्रमक फलंदाजी करू शकतो. आयपीएल 2024 मध्ये क्लासेननं 171.07 च्या स्ट्राइक रेटनं 479 धावा केल्या. मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझी त्याला कायम ठेवू शकते.

(4) शाहबाज अहमद – फिरकी अष्टपैलू शाहबाज अहमदनंही या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. जेव्हा संघाला गरज होती तेव्हा शाहबाजने बॅटनं कमाल केली, तर जेव्हा विकेट घेण्याचा प्रश्न आला, तेव्हा त्यानं चेंडूनं चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शाहबादनंच हैदराबादला विजय मिळवून दिला होता. अशा स्थितीत त्याची कामगिरी लक्षात घेता फ्रँचायझी त्याला आगामी हंगामासाठी कायम ठेवू शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वाधिक षटकार, सर्वाधिक शतकं…पण फायनलमध्ये मात्र सर्वात कमी स्कोर! आयपीएलच्या रेकॉर्डब्रेक सीझनमध्ये बनले अनेक विक्रम

केवळ गंभीरमुळे चॅम्पियन बनला नाही केकेआर, पडद्यामागे राहून ‘या’ व्यक्तीनं घडवलाय चमत्कार!

शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---