राहुल द्रविड निश्चितच भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहेत. ते नेहमी दुसऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. त्यांनी निष्ठा आणि कठोर परिश्रमातून त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक कठीण टप्पे पार केले आहेत. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची बरोबरी करणे खूप कठीण आहे. त्यांच्यामुळे भारतीय संघाने अशियाच्या बाहेरसुद्धा अनेक संस्मरणीय कसोटी विजय नोंदवले आहेत.
त्यांचे वनडे क्रिकेटमधील विक्रमही जबरदस्त आहेत. त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये ३९.१६ च्या सरासरीनुसार १०८८९ धावा केल्या आहेत. ते एकमात्र असे खेळाडू आहेत, जे २ वेळा वनडेतील ३०० पेक्षा जास्त धावांच्या भागीदारींमध्ये सहभागी होते. तरीपण त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही असे सामने राहिले आहेत, ज्यामध्ये त्यांनी चांगले प्रदर्शन केले. पण त्याला जास्त महत्त्व मिळाले नाही.
आम्ही राहुल द्रविड यांच्या कारकिर्दीतील त्याच ४ सामन्यांचा आढावा घेतला आहे. चला बघूया ते चार सामने कोणते आहेत?
१) ७४ धावा वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन
भारताने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अविस्मरणीय कसोटी विजय नोंदवला होता. त्या सामन्यामधील राहुल द्रविड यांचे योगदान आपण कधी विसरू शकणार नाही. द्रविड यांनी त्या सामन्यामध्ये चांगली अशी खेळी खेळून ६४ चेंडूवर ७४ धावा बनवून संघाचा स्कोर ३०३ वर आणला होता. राहुल द्रविड यांनी या सामन्यामध्ये वेगाने धावा करत व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर १३३ धावांची भागीदारीही केली होती. या सामन्यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शतक केले होते.
मात्र या सामन्यामध्ये सगळ्यांचे लक्ष फक्त व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या शतकावर होते आणि राहुल द्रविडच्या खेळीवर सगळ्यांनी दुर्लक्ष अंदाज केले होते. द्रविड यांनी जी खेळी खेळली होती, त्याचा स्ट्राइक रेट ११५.६२ होता आणि त्या सामन्यानुसार तो खूप चांगला होता. भारताने तो सामना जिंकला पण द्रविड यांच्या खेळीला एवढे महत्त्व मिळाले नाही.
२) ८४ धावा वि. दक्षिण आफ्रिका, १९९७ डरबन
डरबनच्या मैदानावर नेहमी रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात फलंदाजी करणे अवघड जाते आणि विशेषत: धावांचा पाठलाग करताना संघांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो. द्रविड यांना १९९७ मध्ये क्रिकेटमध्ये येऊन एकच वर्ष झालं होत. त्यांनी डरबन येथे स्टँडर्ड बँक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेच्या शेवटी आपल्या कारकिर्दीतील एक चांगली खेळी खेळली होती. कारण त्यांच्यापुढे शॉन पोलॉक, एलन डोनाल्ड आणि लान्स क्लूसर हे गोलंदाज होते.
भारताला २७९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. नंतर ते २५१ धावांचे करण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती, सचिन तेंडुलकर यांनी बाद होण्याआधी ३३ चेंडूवर ४५ धावा बनवल्या होत्या. त्यानंतर द्रविड आणि संघाचे कर्णधार अजहरुद्दीन यांनी मिळून डाव पुढे नेला होता. द्रविड यांनी एक बाजू सांभाळत एक चांगली खेळी खेळली होती. तरी त्या सामन्यामध्ये संघ सतत अंतराने विकेट गमावत राहिल्यामुळे द्रविड यांची सर्व मेहनत व्यर्थ गेली होती. भारताने तो सामना गमावला होता. द्रविड यांना त्या सामन्यामध्ये ८४ धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
२) ४४ धावा वि. पाकिस्तान, २००३ सेंच्युरियन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २००३ विश्वचषकामधील एक सामना, जो सचिन तेंडुलकर यांच्या खेळीसाठी नेहमीच लक्षात राहिला. त्यांनी स्वत: पाकिस्तानच्या गोलंदाजांना धू धू धुतले होते. मात्र, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांनी येऊन संघाला सांभाळले नसते तर त्यांचा डाव व्यर्थ ठरला असता.
जेव्हा सचिन ९८ धावा करून बाद झाले, तेव्हा संघाला विजयासाठी ९७ धावांची गरज होती आणि त्यांच्या पुढे वसीम अक्रम, शोएब अख्तर आणि वकार युनूससारखे गोलंदाज होते. पण द्रविड यांनी ज्येष्ठ फलंदाजाची भूमिका निभावली आणि आपल्याबरोबर युवराज सिंग यांनाही पुरेपुर साथ दिली. त्यांनी त्या सामन्यामध्ये नाबाद ४४ धावांची खेळी केली आणि संघाला विजयाकडे घेऊन गेले. त्यांची ती खेळी कधीही नजरअंदाज केली जाऊ शकत नाही.
४) १०९ वि. वेस्ट इंडीज, २००२ अहमदाबाद
क्वचितच हा सामना कोण विसरले असेल, ज्यामध्ये भारताने वेस्ट इंडीजच्या तब्बल ३२५ धावांचा पाठलाग केला होता. ७ सामन्यांच्या वनडे मालिकेतील या चौथ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजने गेलच्या १४० धावांच्या खेळीच्या जोरावर ३२४ धावांचा डोंगराएवढा स्कोर उभा केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्यात सेहवागची पहिल्याच षटकामध्ये विकेट पडली होती. तरी त्या दिवशी राहुल द्रविड यांनी १०९ धावांची खेळी करत संघाला सामना जिकून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेले ‘हे’ आहेत भारतीय क्रिकेटर
सिक्स मास्टर! असे ४ सलामीवीर, ज्यांनी टी२०च्या पहिल्या षटकात ठोकले भरपूर षटकार
‘ऋतुराजसह संघातील इतर युवकांना संधी मिळेल, पण…’, पहिल्या टी२०पूर्वी कर्णधार धवनची प्रतिक्रिया