इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मागचा १३ वा हंगाम कोविडमुळे यूएईमध्ये खेळला गेला होता. पण यावेळी हा हंगाम भारतामध्येच खेळले जाईल. तथापि कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे प्रेक्षकांना मैदानामध्ये जाण्याची परवानगी नाही. क्रिकेट प्रेमींना घरीच डिजिटल माध्यमांद्वारे आपल्या आवडत्या खेळाडूंना खेळताना पाहावे लागेल.
आयपीएलच्या या हंगामामध्ये काही निवडक मैदांनांमध्येच सर्व सामने खेळावे लागतील आणि यानंतर प्लेऑफचे सामने आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा होणार आहे.
आयपीएल एक अशी लीग आहे जिथे खेळाडूने जर चांगले प्रदर्शन केले नाही तर संघ त्या खेळाडूला मुक्त करु शकतात. अनेक वेळा असे पाहिले गेले आहे की खेळाडूने जर एक संघ सोडला तर दुसरा संघ त्याच्यावर बोली लावता. अशामध्ये जो खेळाडू अनेक वर्षे या लीगमध्ये खेळतो, अशी संभावना राहते की तो एकपेक्षा जास्त संघांसाठी खेळताना पाहायला मिळतो.
या लेखामधूनही आपण अशाच ४ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या केकेआर आणि आरसीबी दोन्ही संघांसाठी खेळताना पाहायला मिळाले आहेत.
४. ख्रिस गेल:
यूनिवर्स बॉस ख्रिस गेलने आपल्या आयपीएल कारकिर्दिची सुरुवात कोलकाता नाइट रायडर्स संघासोबत केली होती. त्याने शाहरुख खानच्या मालकीच्या फ्रँचायझीसाठी १६ सामने खेळले, ज्यामध्ये १४१.५९ च्या स्ट्राइक रेटने ४६३ धावा बनविल्या. तथापि केकेआरने त्याला २०१० च्या हंगामानंतर मुक्त केले होते. यानंतर तो लिलावामध्ये अनसोल्ड राहिला होता, पण नंतर त्याला आरसीबीने आपला एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे बदली म्हणून सामील करून घेतले होते.
यानंतर आरसीबीचे नशीब पालटून गेले. कारण गेलने ऑरेंज कॅप जिंकली आणि आरसीबीला फायनलपर्यंत घेऊन गेला. गेलने बेंगलोरसाठी ८५ सामन्यांमध्ये ३१६३ धावा बनविल्या. ज्यामध्ये ५ शतके आणि १९ अर्धशतके सामील आहेत. सध्या गेल पंजाब किंग्सचा भाग आहे.
३. रॉबिन उथप्पा:
रॉबिन उथप्पाने आपल्या आयपीएल कारकिर्दीमध्ये अनेक संघांमध्ये योगदान दिले आहे. उथप्पाने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी केली होती. पण उथप्पाला पुढच्या हंगामामध्ये आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली. उथप्पाने आरसीबीसाठी ३१ सामने खेळले आणि त्याला संघाने २०१० नंतर मुक्त केले. यानंतर तो पुणे वॉरियर्ससाठी देखील खेळला.
यानंतर २०१४ सालामध्ये त्याला केकेआरने आपल्यासोबत सामील करून घेतले आणि हे दोघांसाठी देखील फायदेशीर सिद्ध झाले. उथप्पाने केकेआरच्या विजेतेपदामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले. या खेळाडूने केकेआरसाठी २०१४ पासून २०१८ दरम्यान ८६ सामने खेळले.
२. जॅक कॅलिस:
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस आपल्या आयपीएल कारकिर्दिमध्ये दोन संघांसोबत खेळला आहे. कॅलिसने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००८ सालामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसोबत केली होती. तीन वर्षे तो या संघाचा भाग राहिला आणि त्याने ४२ सामने खेळताना ११३२ धावा बनविल्या. यानंतर या संघाने त्याला मुक्त केले होते.
लिलावामध्ये केकेआरने कॅलिसवर विश्वास दाखवला आणि त्याला आपल्या संघामध्ये सामील केले. कॅलिसने देखील या संघांसाठी जबरदस्त प्रदर्शन केले. कॅलिसने या संघासाठी चार हंगाम खेळताना ५६ सामने खेळले आणि या दरम्यान त्याने १२९५ धावा बनविल्या.
१. उमेश यादव:
या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळण्यास तयार असलेल्या उमेश यादवने आपल्या कारकिर्दिची सुरवात दिल्लीच्या संघासोबतच केली होती. तथापि, दोन हंगामानंतर २०१४ मध्ये केकेआर संघाने त्याला आपल्या संघासोबत जोडले आणि तिथे त्याने मुख्य गोलंदाजाची भूमिका साकारली. त्याने या संघासाठी ४७ सामने खेळले.
यानंतर साल २०१८ मध्ये तो विराट कोहलीच्या आरसी संघासोबत जोडला गेला. आरसीबीसाठी तो स्ट्राइक गोलंदाज होता. पण त्याच्या धावा खर्च करण्याच्या सवयीमुळे संघाने त्याला मुक्त केले होते. उमेशने आरसीबीसाठी एकूण २७ सामने खेळले.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचे असे ३ खेळाडू ज्यांनी आयपीएल खेळले आहे, पण तुम्हाला कदाचित त्यांच्याबद्दल माहितीही नसेल
टी२० मालिकेदरम्यान संघातून वगळल्यानंतर कसे वाटले? शिखर धवनने दिले ‘हे’ उत्तर






