भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शानदार प्रदर्शन केले. एकदिवसीय मालिकेदरम्यान शिखर धवनने हे सिद्ध केले की, अव्वल क्रमातील फलंदाज म्हणून चांगली खेळी करण्याची त्याच्याकडे अजूनही बरीच ताकद आहे.
सन 2018 पासून तो भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. परंतु, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो बर्यापैकी नियमित आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यापासून तो अवघ्या 23 धावा दूर आहे. सध्या तो रोहित शर्मासह भारताचा सर्वोत्कृष्ट सलामीवीर म्हणून ओळखला जातो.
एकदिवसीय सामन्यात रोहितबरोबर त्याची चांगलीच जोडी जमते. यामुळेच रोहित आणि धवनच्या सलामी जोडीने आतापर्यंत भारतासाठी 16 शतकीय भागीदारी केल्या आहेत.
तसेच शिखरला इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर अंतिम 11 जणांच्या संघातून वगळण्यात आले होते. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात शिखर धवन सपशेल अपयशी ठरला होता आणि त्याने त्या सामन्यात फक्त 4 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या चार टी
20 सामन्यांमधून त्याला बाहेर करण्यात आले. परंतु एकदिवसीय मालिका सुरू झाली तेव्हा अंतिम 11 जणांच्या भारतीय संघामध्ये जागा देण्यात आली आणि त्याने पहिल्याच सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करत 98 धावा फटकावल्या.
दुसर्या एकदिवसीय सामन्यात धवन पुन्हा अपयशी ठरला आणि 17 चेंडूत केवळ 4 धावा करून तो बाद झाला. पण पुन्हा तिसर्या आणि निर्णायक सामन्यात त्याने जबरदस्त खेळ केला. तिसर्या एकदिवसीय सामन्यात धवनने रोहितबरोबर 103 धावांची भागीदारी केली. तसेच त्याने वैयक्तिक 67 धावा केल्या.
तिसर्या एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने शिखर धवनला टी20 मालिकेमधून बाहेर केल्यानंतर त्याला कसे वाटले होते? असे विचारले असता या प्रश्नाला उत्तर देताना धवन मजेने म्हणाला की, “मी नेहमीच लयीमध्ये असतो, फक्त खेळत नाही.”
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळलेल्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन बर्यापैकी यशस्वी झाला. त्याने तीन सामन्यात 2 अर्धशतके झळकावत एकूण 169 धावा केल्या. धवनने धावांच्या बाबतीत या एकदिवसीय मालिकेतील तिसरे स्थान पटकावले. या एकदिवसीय मालिकेत त्याच्यापेक्षा जास्त जॉनी बेअरस्टोने (219) आणि केएल राहुलने (177) धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो गोलंदाजांची क्षमता जाणतो”, सीएसकेच्या ‘या’ अष्टपैलूने केले धोनीचे कौतुक
पंजाब किंग्ससाठी आनंदाची बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला ‘हा’ खेळाडू आयपीएलसाठी सज्ज