क्रिकेटच्या मैदानात अनेकदा हैराण करणारे प्रसंग घडत असताना. परंतु तुम्ही प्रत्यक्षात कधी एका सामन्यात एका संघासाठी चार खेळाडूंना यष्टीरण करताना पाहिले नसेल. मात्र, असे घडले होते. क्रिकेटच्या इतिहासात आजच्याच दिवशी म्हणजे २५ जुलै १९८६ रोजी लॉर्ड्स स्टेडियवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला गेला होता. या सामन्यात इंग्लंडसाठी एकूण ४ खेळाडूंना यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडाली होती. यापैकी एकाचे वय ४५ होते, ज्याच्यावर निवृत्तीनंतर मैदानात पुनरागमन करण्याची वेळ आली होती.
न्यूझीलंड संघ १९८६ मध्ये जेरेमी कोनी यांच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर होता. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जुलै रोजी इंग्लंड संघानी धावसंख्या २५८ असताना सहावी विकेट गमावली होती. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ब्रूस फ्रेंच फलंदाजीसाठी उतरले. ११ चेंडू खेळून झाल्यानंतरही त्यांना एकही धाव करता आली नव्हती. गोलंदाज रिचर्ड हेडलीच्या एका बाउंसरपासून वाचण्यासाठी ब्रूस माघे सरकले होते, पण चेंडू त्यांच्या हेलमेटला लागला. चेंडू लागल्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त निघाले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेले. इंग्लंडचा पहिला डाव ३०७ धावांवर संपला.
निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात परतला दिग्गज
आता इंग्लंड संघाला गोलंदाजी करायची होती, पण त्यांच्याकडे यष्टीरक्षक नसल्यामुळे तिसऱ्या क्रमांक खेळणारे बिल ऐतथे यांनी ती भूमिका स्वीकारली. बिलने फक्त दोन षटके यष्टीरक्षण केले आणि नंतर मैदानात चांगलाच गोंधळ झाला. याप्रसंगी इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक बॉब टेलर मैदानात उपस्थित होते. इंग्लंड संघाचे कर्णधार माईक गैटिंगने टेलरला निवृत्तीनंतर मैदानात पुनरागमन करण्यासाठी राजी केले. त्यानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराचीही देखील परवानगी घेतली.
पाहूण्या संघाने परावानगी दिल्यानंतर वयाच्या ४५ व्या वर्षी टेलरने मैदानात पुनरागमने केले आणि इंग्लंडसाठी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली. त्यांचे सामन्यातील प्रदर्शन पाहून असे, अजिबात वाटले नाही की, ते मोठ्या काळापासून क्रिकेट खेळले नाेहीत. परंतु पुढच्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यानंतर बॉबी पार्क्सने टेलरची जागा घेत यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली. बॉबी देखील या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते, पण गरजेच्या वेळी त्यांना संघात सहभागी केले गेले.
दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त झालेले ब्रूस फ्रेंच सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा फिट झाले आणि संघात पुनरागमन केले. परंतु त्यांना यष्टीरक्षकाची भूमिका बजावता आली नाही. कारण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने ३४२ धावा करून ९ विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या दिवशी या धावसंख्येवर न्यूझीलंडचा डाव संपला. खास गोष्ट तर ही आहे की, या कसोटी सामन्यात ब्रूस फ्रेंच, बिल ऐथे, बॉब टेलर आणि बॉबी पार्क्स यांच्यातील एकाने देखील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत एकही झेल घेतला नाही.
सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने ३०७ आणि न्यूझीलंडने ३४२ धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने ६ विकेट्सच्या नुकसानावर २९५ धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तारत न्यूझीलंडला विजयासाठी २६१ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पंरतु त्यांचा संघ २ विकेट्सच्या नुकसानावर ४१ धावा करू शकला. परिणामी सामना अनिर्णीत झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI। विंडीजला हरवत ‘गब्बर’ने केली ‘कॅप्टन कुल अन् दादा’ची बरोबरी
‘हाऊ इज द जोश!’ मालिका विजयानंतर टीम इंडियाचे जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ