येत्या आयपीएलचा 18वा सीझन 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. त्याआधी मेगा लिलाव आयोजित केले जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यंदाच्या मेगा लिलावात 409 परदेशी खेळाडूंनीही लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत. जे 16 वेगवेगळ्या देशांतील आहेत. यामध्ये 6 सहयोगी देशांच्या खेळाडूंचाही समावेश आहे. लिलावासाठी सर्वात जास्त परदेशी खेळाडूंची नावे दक्षिण आफ्रिकेतून पाहण्यात आली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत.
इंडियन प्रीमियर लीगने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, यावेळी दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक विदेशी खेळाडूंनी लिलावात सहभागी होण्यासाठी आपली नावे दिली असून, त्यात त्यांच्या खेळाडूंची संख्या 91 आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. ज्यात 76 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय या यादीत इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. जिथून 52 खेळाडूंनी लिलावात सहभागी होण्यासाठी आपली नावे दिली आहेत. असोसिएट देशांबद्दल सांगायचे तर, कॅनडाचे 4, नेदरलँडचे 12, स्कॉटलंडचे 2, यूएसएचे 10, याशिवाय युएई आणि इटलीच्या प्रत्येकी एका खेळाडूने मेगा लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावाच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी, 31 ऑक्टोबर रोजी, सर्व 10 फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली होती. त्यानंतर केवळ 204 स्लॉट रिक्त आहेत. ज्यामध्ये एक संघ जास्तीत जास्त 25 खेळाडू राखू शकतो.
मेगा लिलावासाठी देशांनी नोंदणी केलेल्या खेळाडूंची संख्या-
अफगाणिस्तान 29
ऑस्ट्रेलिया 76
बांग्लादेश 13
कॅनडा 4
इंग्लंड 52
आयर्लंड 9
इटली 1
नेदरलँड 12
न्यूझीलंड 39
स्कॉटलंड 2
दक्षिण आफ्रिका 91
श्रीलंका 29
युएई 1
यूएसए 10
वेस्ट इंडिज 33
झिम्बाब्वे 8
हेही वाचा-
आयपीएल मेगा लिलावापूर्वीच श्रेयस अय्यरचा वाढला ‘भाव’, अनेक फ्रँचायझींकडून मिळतेय खास ऑफर
“तू नेहमीच माझा कर्णधार…” श्रेयस अय्यर नाही, तर शाहरूख खानला आठवतोय ‘हा’ दिग्गज
आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त खेळाडू, तारिख आणि ठिकाणही समोर