-अमोल बांगर
टी२० क्रिकेट प्रकाराचे आगमन झाल्यापासून वनडे सामने खेळण्याची शैली देखील बदलली आहे. इथे फलंदाज पहिल्याच चेंडू पासून आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करताना दिसून येतात. ज्यामुळे अर्धशतक आणि शतक वेगाने बनत आहेत, ज्याचा परिणाम आता दिसून येतोय.
सध्याच्या काळात जलद शतकी खेळी विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गज खेळाडू एबी डिविलियर्सच्या नावावर आहे. ज्याने वेस्ट इंडिजविरूद्ध फक्त ३१ चेंडूत शतक साजरं केलं होत. सध्या खेळत असलेल्या खेळाडू समोर हा विक्रम मोडणे हे एक कठीण आव्हान आहे.
आज आपण या लेखात त्या ५ फलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडे डिविलियर्सच्या या विक्रमाला मोडण्याचं सामर्थ्य आहे. भविष्यात यांपैकी एखादा खेळाडू हा विक्रम आपल्या नावे करू शकतो. या यादीमध्ये एका भारतीय खेळाडूचादेखील समावेश आहे. ज्याने आजपर्यंत त्याच्या खेळात निरंतर आक्रमकता दाखवली आहे .
५. निकोलस पूरन
तसं पाहिलं तर प्रत्येक वेस्ट इंडिज खेळाडूमध्ये क्षमता आहे. परंतु युवा निकोलस पूरन (Nicholas Pooran) हा विक्रम मोडण्याचे सामर्थ्य ठेवतो. पूरनने निरंतर मधल्या फळीत फलंदाजी करत संघाला सांभाळून घेतलं आहे. पूरन पहिल्या चेंडूपासून मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता ठेवतो आणि ती त्याने नुकतीच दाखवूनही दिली आहे.
पूरनने आतापर्यंत खेळलेल्या २५ वनडे सामन्यात ४९.०५ च्या उत्तम सरासरीने ९३२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १०६.५१ होता. जो या प्रकारात खूप कमी दिसून येतो. पूरनचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे. पुरन सहजरीत्या षटकार मारताना दिसून येतो, जे आता त्याचे वैशिष्ट्य बनले आहे.
पुरन कोणत्याही गोलंदाजांसमोर मोठे षटकार मारताना दिसून येतो. त्यामुळे तो डिविलियर्सचा हा विक्रम मोडतानाही दिसू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा देखील ठेवली जाते.
४. जेसन रॉय
इंग्लंड संघाचा सलामीचा फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) देखील त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. त्याने सलामीवीर म्हणून निरंतर धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्याचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. रॉय पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो.
रॉयने आतापर्यंत ८७ वनडे सामन्यांमध्ये ४२.३९ च्या सरासरी ने ३४३४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ९ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १०७.२७ होता. ८७ सामने खेळूनही हा स्ट्राईक रेट खूप चांगला राहिला आहे.
रॉय खूप सहज रीतीने षटकार मारताना दिसून येतो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. रॉय कोणत्याही गोलंदाजांसमोर मोठे षटकार मारताना दिसतो. त्यामुळे तो डिविलियर्सचा हा विक्रम मोडताना दिसू शकतो. आणि त्याच्याकडून ही अपेक्षा ही केली जाते.
३. डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner)हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे. त्याने सातत्याने सलामीला येऊन आक्रमकपणे धावा काढल्या आहेत. अगदी पहिल्या चेंडूपासून तो फटकेबाजी सुरु करु. जलद शतक करायचे असेल तर पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी खूपच गरजेची असते.
वॉर्नरने १२३ वनडे सामन्यात ४५.८० च्या सरासरीने ५२६७ धावा केल्या आहेत. त्यात १८ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट ९५.७६ होता. वॉर्नर प्रत्येक सामन्यात संघाला वेगवान सुरवात देताना दिसून येतो. त्याकडूनही एबीचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.
२. रोहित शर्मा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एक मॅच विनर खेळाडू आहे. तसेच जगातील तो आजपर्यंतचा सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. ज्या दिवशी रोहित खेळतो, त्यादिवशी मैदानावरील २२ खेळाडूंपैकी फक्त त्याचीच चर्चा होते. त्याच्या नावावर वनडेत ३ द्विशतके आहेत. रोहित डावाची सुरुवात थोडी संथ करतो व पुढे मात्र अतिशय वेगाने धावा करतो. असे असले तरी तो देखील जलद शतकी खेळी करु शकतो.
रोहितने २२४ वनडे सामन्यात ४९.२७ च्या सरासरीने ९११५ धावा केल्या आहेत.ज्यात २९ शतक आणि ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ८८.९२ चा राहिला आहे.
१. जॉस बटलर
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler)ने फारच क्वचित वेळा १०० पेक्षा जास्त चेंडूत शतक केले असेल. तो एक तुफान फलंदाजी करणारा फलंदाज आहे. इंग्लंडकडून त्याने फिनिशर म्हणून सातत्याने धावा केल्या आहेत. तो सध्या खूप मोठा सामना जिंकणारा खेळाडू आहे.
बटलरने १४२ वनडे सामन्यांमध्ये ४०.८८ च्या सरासरीने ३८४३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ९ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट ११९.८३ आहे.
हा खेळाडूही नक्कीच एबीचा विक्रम मोडण्याची क्षमता ठेवतो.
वाचनीय लेख-
-हवामान, खेळपट्टी, विरोधी संघ या कशाचाच अजिबात फरक न पडणारे जगातील ३ क्रिकेटर्स
-सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक करणारे ५ क्रिकेटपटू
-दोस्ती! एकत्र सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या जगातील ५ जोड्या, दोन आहेत भारतीय






