वनडे क्रिकेटमधील सध्याच्या घडीचा दिग्गज फलंदाज म्हणून रोहित शर्मा ओळखला जातो. एकदा सेट झाल्यावर तो मोठ्या धावसंख्येकडे जातो. त्याची शतक सुद्धा मोठी असतात. तो एकमेव फलंदाज आहे ज्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक आहेत. श्रीलंकेविरुद्ध 2014 साली कोलकत्याच्या ईडन गार्डनवर रोहित शर्माने केलेली 264 धावांची खेळी ही वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च खेळी आहे. आणि या विक्रमाला मागे टाकणे खुप अवघड आहे. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल माहिती सांगणार आहे जे भविष्यात रोहित शर्माचा विक्रम तोडू शकतात.
१)डेव्हिड वॉर्नर- ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या आक्रमक अंदाजासाठी ओळखला जातो. त्याच्यात मोठी खेळी खेळण्याची क्षमता देखील आहे. डेव्हिड वॉर्नरची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 179 धावा आहे. जरी त्याच्या नावावर द्विशतक नसले तरी डेव्हिड वॉर्नर आपल्या सर्वोत्तम दिवशी रोहित शर्माचा 264 धावांचा विक्रम तोडू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरने त्रिशतक झळकावले आहे. त्यामूळे त्याच्यात मोठी खेळी करण्याची क्षमता आहे असे दिसून येते.
2)जेसन रॉय- इंग्लंडचा हा आक्रमक सलामीवीर 100पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करतो. वनडे क्रिकेटमध्ये रॉयचा स्ट्राईक रेट 107.15 असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 180 धावा आहेत. हा खेळाडू सुद्धा आपल्या सर्वश्रेष्ठ दिनी रोहितच्या विक्रमाला गवसणी घालू शकतो.
३)विराट कोहली- भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली, धावांचा पाठलाग करण्यात मास्टर म्हणून ओळखला जातो. विराटच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 43 शतक आहेत, तेही 59.07 च्या जबरदस्त सरासरीने. कोहली भारतीय संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तो देखील आपल्या सर्वश्रेष्ठ दिनी रोहित शर्माचा विक्रम तोडू शकतो.
४)इविन लुईस- वेस्टइंडिज संघाचा हा सलामीवीर पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करतो. टी20 आणि वनडे या दोन्ही प्रकारात तो एकाच अंदाजात खेळतो. त्याने 176 धावांची आक्रमक खेळी देखील वनडे क्रिकेटमध्ये खेळलेली आहे. तसेच टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 155 पेक्षा जास्त आहे. भविष्यात तो देखील रोहित शर्माचा विक्रम मोडू शकतो.
५)एरॉन फिंच- रोहित शर्माच्या 264 धावांच्या पुढे जाण्याची धमक ऑस्ट्रेलियन फलंदाज एरॉन फिंचमध्ये देखील आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 17 शतक आहे. तसेच टी20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात त्याने 172 धावांची खेळी केली होती, यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की वनडे क्रिकेटमध्ये तो लवकरच द्विशतक झळकावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
भारतीय संघात प्रथमच निवड होऊनही चेतन सकारियाने व्यक्त केली ही खंत
झिरोच झिरो! कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल इतक्या वेळा शून्यावर बाद झाला हा दिग्गज
श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्त झाल्यावर शिखर धवनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला…