भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी (१० जून) भारतीय संघ जाहीर केला आहे. संघाचा कर्णधार म्हणून शिखर धवनला निवडण्यात आले आहे व भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. या संघात ऋतुराज गायकवाड , चेतन साकारिया, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा या खेळाडूंना त्यांच्या चांगल्या प्रदर्शनांचे बक्षीस मिळाले आहे. त्यांना भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
हा २० सदस्यीय संघ आहे परंतु त्यात काही खेळाडू आहेत ज्यांचा समावेश केला गेलेला नाही. अनेकांना प्रश्न पडला आहे की विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी अशा खेळाडूंचा समावेश का नाही.
त्यामागे कारण असे की सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका भारताला खेळायची आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्याचमुळे त्यांचा श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात समावेश नाही. याच कारणामुळे श्रीलंका दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
श्रेयस अय्यर आणि टी नटराजन यांचा भारतीय संघात का समावेश नाही ?
त्याचबरोबर आणखी एक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला गेला की श्रेयस अय्यर आणि टी नटराजन यांचा श्रीलंका दौऱ्यासाठी समावेश का नाही? त्याचे कारण असे की सध्या अय्यर आणि नटराजन दोघेही दुखापतीतून सावरत आहेत.
आयपीएल २०२१पूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुशे एप्रिलमध्ये त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याला आयपीएल २०२१च्या पहिल्या सत्राला देखील मुकावे लागले. त्यामुळे तो सध्या या दुखापतीतून सावरत आहे.
दुसरीकडे नटराजन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले. पण आयपीएल २०२१ चा हंगाम खेळत असताना त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने उचल खाल्ली. त्यामुळे त्याला त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे तो देखील सध्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतींमुळेच सध्या हे दोघेपण क्रिकेटपासून दूर आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी उभई संघ अश्या प्रकारे
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल , ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
महत्वाच्या बातम्या
‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आहे कोट्यावधी रुपयांचा मालक, कमाई पाहून व्हाल थक्क
‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा