fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५ असे खेळाडू, जे आयपीएलमध्ये झालेत सर्वाधिक वेळा रनआऊट

5 batsmen got run out most times in ipl so far

September 22, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals


आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाजांच वर्चस्व राहिले आहे, परंतु कधीकधी गोलंदाजही यशस्वी झाले आहेत. प्रत्येक आयपीएल सामन्यात प्रेक्षक आपल्या आवडत्या खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करतात. बर्‍याच वेळा त्यांना त्यात आनंद मिळतो आणि काही प्रसंगी ते निराशही होतात. गेल्या १२ वर्षांत या स्पर्धेत अनेक जागतिक क्रिकेट खेळाडू आले आणि गेले.

आयपीएलमध्ये फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि चौकार-षटकार मारला नाही तर एक-दोन किंवा तीन धावा करण्यासाठी अनेकदा वेगाने धाव घेत धावसंख्यात भर घालतात. परंतु बर्‍याच वेळा वेगाने धावताना खेळाडू धावबाद होतात. या लेखात, आयपीएलमधील सर्वाधिक धावबाद झालेल्या ५ खेळाडूंचा आढावा घेतला आहे.

आयपीएलमधील ५ सर्वाधिक धावबाद खेळाडू

५. मुरली विजय

या खेळाडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १०४ सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्ये १२ वेळा धावबाद झाला आहे. सर्वाधिक धावबाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये मुरली विजय पाचव्या स्थानावर आहे. मात्र, त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये त्याने २५८८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये दोनदा शतकही केले आहे.

४. अंबाती रायुडू

चेन्नई सुपर किंग्जचा हा खेळाडू पूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. आतापर्यंत तो आयपीएलमध्ये १३ वेळा धावबाद झाला असून या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रायुडूने १५८ सामन्यांत ३३७१ धावा केल्या असून एक शतकही त्याच्या नावावर आहे. याशिवाय अंबाती रायुडूची १८ अर्धशतकेही आहेत.

३. सुरेश रैना

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावबाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैनाही आहे. सुरेश रैना १९३ सामने खेळला आहे आणि १३ वेळा धावबाद झाला आहे. आयपीएलमध्ये एक शतक झळकावणार्‍या सुरेश रैनाने ५३०० धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

२. शिखर धवन

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. १६० सामने आणि ४५७९ धावा केल्या आहेत. त्याने यात ३७ अर्धशतके केली आहेत. तो एक महान सलामीवीर फलंदाज आहे. शिखर धवन आतापर्यंत आयपीएलमध्ये १५ वेळा धावबाद झाला असून या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

१. गौतम गंभीर

गौतम गंभीर आयपीएलच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक नाव आहे. परंतु, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून कर्णधार म्हणून खराब कामगिरी झाल्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसेच आयपीएलमधील धावचीत बाद होण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. गंभीर आयपीएलमध्ये १६ वेळा धावबाद झाला आहे. गंभीरने १५४ सामन्यांत ४२१७ धावा केल्या आहेत. त्याने केकेआरचे नेतृत्व करत असताना दोनदा आयपीएल चषकावर नाव कोरले होते.


Previous Post

किंग्ज इलेव्हन पंजाबने एकदा गाठली होती अंतिम फेरी, या वेळी होणार विजेता…?

Next Post

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

आता तयारी इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्याची! पाहा पुण्यासह आणखी कुठे आणि कधी होणार टीम इंडियाचे सामने

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ KKRiders

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

Photo Courtesy: Twitter/Sunrisers

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची 'ही' आहेत ५ कारणे, घ्या जाणून...

Photo Courtesy: www.iplt20.com

आयपीएल जिंकण्याच्या केकेआरच्या शक्यता वाढल्या, कारणही आहे तसंच खास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.