आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या विक्रमाविषयी बोललं तर सचिन तेंडुलकरच नाव पहिल्यांदा येतं. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकं आणि अर्धशतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.या व्यतिरिक्त असेही चार खेळाडू आहेत, ज्यांनी तब्बल १००पेक्षा जास्त वेळा वनडे सामन्यात ५० किंवा अधिक धावा केल्या आहेत.
५ – विराट कोहली – भारत (१०१)
विराट कोहलीने(Virat Kohli) आतापर्यंत भारताकडून २४८ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ४३ शतकं आणि ५८ अर्धशतकांसह ११,८६७ धावा केल्या आहेत. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये कोहली एक मात्र फलंदाज आहे, ज्याच्या नावावर १०० पेक्षा जास्त अर्धशतकीय खेळी आहेत. वनडे शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर एकमात्र फलंदाज कोहलीच्या पुढं आहे. म्हणलं जात आहे की, कोहली लवकरच सर्वात जास्त शतकांचा विक्रम आपल्या नावावर करेल.
४ – जॅक कॅलिस – दक्षिण आफ्रिका (१०३)
दक्षिण आफ्रिकाकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस(Jack Kallis) याने आपल्या वनडे कारकिर्दीत १७ शतकं आणि ८६ अर्धशतकांबरोबर ११५७९ धावा केल्या आहेत. आफ्रिकेकडून वनडेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच बरोबर कसोटी क्रिकेटमध्ये ही हा विक्रम त्याच्या नावावर आहे.त्याने कसोटीमध्ये एकूण १३,२८९ धावा केल्या आहेत.
३ – रिकी पॉटिंग – ऑस्ट्रेलिया (११२)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पॉटिंग(Ricky Ponting) याचंही नाव या यादीत येत.त्याने ३७५ आंतरराष्ट्रीय वनडेत ३० शतकं आणि ८२ अर्धशतकांच्या मदतीने १३,७०४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.याव्यतिरिक्त त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १३,३७८ धावा केल्या आहेत.
२ – कुमार संगकारा – श्रीलंका (११८)
श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा(Kumar Sangakara) याने वनडे कारकिर्दीत एकूण ४०४ सामने खेळले आहेत.त्यात त्याने २५ शतकं आणि ९३ अर्धशतकांच्या मदतीने १४,२३४ धावा केल्या आहेत. वनडे मध्ये ५० पेक्षा जास्त धावा सर्वाधिक वेळा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
१ – सचिन तेंडुलकर – भारत (१४५)
भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याच्या नावावर वनडेत सर्वात जास्त ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने ४६३ वनडे सामन्यांत ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांच्या जोरावर १८,४२६ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतकं केली आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या नावावर अजूनही काही विक्रम आहेत.