यंदाच्या दुलीप ट्रॉफीची पहिली फेरी संपली आहे. या कालावधीत भारत ‘ब’ आणि भारत ‘क’ संघांनी नेत्रदीपक विजयांची नोंद करून स्पर्धेत आघाडी घेतली आहे. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी विराट कोहली बऱ्याच दिवसांनी भारताच्या पांढऱ्या जर्सीमध्ये मैदानात दिसणार आहे. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात 5 मोठ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. जे दुलीप ट्रॉफी 2024 चा देखील भाग होते. मात्र, आता हे खेळाडू 12 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होणार नाहीत. बीसीसीआयने त्यांच्या जागी इतर खेळाडूंचा समावेश केला आहे, त्यामुळे टी-20 स्टार फलंदाज रिंकू सिंगलाही संधी मिळाली आहे. अशा परिस्थितीत आता रिंकू सिंग भारत ‘ब’ संघाचा भाग असणार आहे. रिंकू सिंग व्यतिरिक्त अक्षय नारंग, एसके रशीद आणि शम्स मुलानी दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत भारत ‘अ’ संघाचा भाग असतील.
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत दिसलेले शुबमन गिल, केएल राहुल, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रिषभ पंत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होणार नाहीत. अशा परिस्थितीत आता हे पाच खेळाडू बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी पाहता भारतीय संघात सामील होणार आहेत. एकीकडे शुबमन गिल दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारत ‘अ ‘संघाचे नेतृत्व करताना दिसला होता, तर दुसरीकडे केएल राहुल आणि कुलदीप यादव देखील त्याच संघाचा भाग होते. तसेच रिषभ पंत इंडिया ‘बी’ कडून खेळताना दिसला आणि अक्षर पटेल इंडिया ‘डी’ कडून खेळताना दिसला.
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
हेही वाचा-
यशस्वीने बिघडवला शुबमनचा खेळ? गिलचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…
IPL: कोहलीचा ‘मास्टर प्लॅन’ अन् धोनी बाद? स्टार खेळाडूने सांगितला किस्सा!ॉ
IPL 2025: केएल राहुलची होणार सुट्टी? लखनऊला मिळणार नवा कर्णधार?