ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने आधीच २ सामने जिंकून आघाडी घेतली होती. मंगळवारी (८ डिसेंबर) तिसरा सामना जिंकून त्यांच्याकडे यजमान संघाला व्हाईटवॉश देण्याची संधी होती. परंतु भारताला या सामन्यात १२ धावांनी पराभूत व्हावे लागले.
या लेखात आपण भारताच्या पराभवाची ५ कारणे जाणून घेणार आहोत.
१. खराब क्षेत्ररक्षण
भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात अतिशय सुमार क्षेत्ररक्षण केले. मॅथ्यू वेड व ग्लेन मॅक्सवेल यांचे अनेक झेल भारतीय खेळाडूंनी सोडले. मॅक्सवेलला या सामन्यात ३ जीवनदान मिळाले. चहलच्या गोलंदाजीवर एकदा मॅक्सवेलचा झेल देखील पकडण्यात आला होता. मात्र तो नो बॉल ठरला. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघ १८६ धावा करू शकला.
२. प्रत्येक वेळी घेतला गेला चुकीचा रिव्ह्यू
पवार प्लेनंतर कर्णधार विराट कोहली हा सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळे योग्य रिव्ह्यू घेण्याचे काम उपकर्णधार केएल राहुलवर होते. मात्र, या सामन्यात राहुल रिव्ह्यू बाबत अयशस्वी ठरला. नटराजनच्या गोलंदाजीवर वेड बाद असूनदेखील राहुलने रिव्ह्यू घेतला नाही. क्षेत्ररक्षण करतांना भारताने एकूण २ रिव्ह्यू घेतले, पण ते दोन्हीही अयशस्वी ठरले. फलंदाजी करताना देखील श्रेयस अय्यरने रिव्ह्यू घेतला होता पण तो देखील अयशस्वी ठरला.
३. विराट वगळता इतर फलंदाज ठरले अपयशी
तिसऱ्या टी२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने उत्तम फलंदाजी केली. विराटने ६१ चेंडूत ८५ धावा केल्या. मात्र, त्याला इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. शिखर धवन (२८) आणि हार्दिक पंड्या (२०) यांनी काही धावा जमवल्या पण संघाला विजय मिळवण्यासाठी त्या कमी ठरल्या.
४. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या सापळ्यात अडकले भारतीय फलंदाज
भारतीय फलंदाज हे फिरकी गोलंदाजांना उत्तम खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, या सामन्यात भारताच्या ७ पैकी ५ बळी फिरकी गोलंदाजांनी पटकावले. मिचल स्वेप्सनने ३, तर ऍडम झापा व मॅक्सवेलने प्रत्येकी १ बळी मिळवला.
५. या ३ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बदलला सामना
या सामन्यात मॅथ्यू वेड व ग्लेन मॅक्सवेल या दोन फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. वेडने ८०, तर मॅक्सवेलने आक्रमक ५४ धावा जमवल्या. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने १८६ धावांचा डोंगर उभा केला. तसेच ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्वेप्सनने देखील उत्तम कामगिरी केली. स्वेप्सन ने ४ षटकात केवळ २३ धावा देत ३ बळी मिळवले. या तिन्ही खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे भारताला पराभव पत्करावा लागला.
ट्रेंडिंग लेख-
अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज
टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
VIDEO: ऑस्ट्रेलियाच्या नवोदित अष्टपैलूचा दणका; शतकी खेळीनंतर ‘पृथ्वी शॉ’ला केले सापळा रचून बाद