५. ख्रिस गेल (इंग्लंड विरुद्ध, ५ धावा)
ख्रिस गेलला त्याच्या विस्फोटक गोलंदाजीसाठी ओळखले जाते. परंतु, हा धाकड फलंदाजाने आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघातील फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवण्याचेही काम केले आहे. २० जुलै २००० साली वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात नॉटिंघम येथे एक सामना पार पडला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने इंग्लंडला १९६ धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडने वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४९व्या षटकापर्यंत ७ विकेट्स गमावत १९० धावापर्यंतची मजल मारली होती.
परंतु, शेवटच्या षटकात गेलमुळे संपूर्ण डाव पालटला. गेलने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरच पॉल फ्रॅंकची विकेट घेतली. तर, तिसऱ्या चेंडूवर डॅरेन गॉफला त्रिफळाचीत आणि पाचव्या चेंडूवर ऍलन मुलालीला पायचीत केले. त्यामुळे ४९.५ षटकात १९२ धावांवर इंग्लंड संघ सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजने ३ धावांनी तो सामना जिंकला.
४. इमरान खान (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, ४ धावा)
पाकिस्तानचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू इमरान खान यांनी वर्ल्ड सीरीज १९९० मध्ये एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना शेवटच्या षटकात ४ धावा करु दिल्या नव्हत्या. झाले असे की, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला २२१ धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. त्यांना सामन्यातील शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावांनी आवश्यकता होती. परंतु, शेवटचे षटक टाकणाऱ्या इमरान यांनी आपल्या रिव्हर्स स्विंग आणि यॉर्कर्सने ओडोनेल आणि रॅकरमन या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले होते. फक्त १ धाव देत त्यांनी हा कारनामा केला होता आणि पाकिस्तानला २ धावांनी तो सामना जिंकून दिला होता.