कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अशामध्ये भारतात क्रिकेट जगतातून अनेक दिग्गजांनी आपापल्या परीने होईल ती मदत केली आहे. यापाठोपाठ आता क्रिकेट बोर्डही कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
यामध्ये आता आपण असे ६ क्रिकेट बोर्ड पाहणार आहोत, ज्यांचा भारतीयांना या मदतीसाठी कायमच अभिमान वाटला पाहिजे.
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मदत करणारे ५ क्रिकेट बोर्ड-
६. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Saurashtra Cricket Association) प्रत्येकी २१ लाख रुपये गुजरातच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीला आणि पंतप्रधान सहाय्यक निधीला देणार आहे.
Saurashtra Cricket Association contributes Rs 21 lacs each towards @PMOIndia relief fund & @CMOGuj relief fund. We pray for everyone’s good health @narendramodi @MoHFW_INDIA @AmitShah @vijayrupanibjp @KirenRijiju @BJP4India @INCIndia @SGanguly99 @JayShah #IndiaFightsCorona pic.twitter.com/cEVY9Ch5ie
— Saurashtra Cricket (@saucricket) March 27, 2020
५. बंगाल क्रिकेट असोसिएशन-
बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी राज्य शासनाला २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. तसेच सीएबीचे अध्यक्ष अभिषेक दालमिया (Avishek Dalmiya) म्हणाले की एक जबाबदार संस्था म्हणून पुढे येऊन सरकारला पाठिंबा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
या व्यतिरिक्त दालमिया यांनी सरकारच्या मदत निधीला ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
CAB Treasurer #DebasishGanguly talks about the #CoronaVirus / #Covid19 Pandemic and how CAB has donated 25 lakhs towards the Government's Emergency Relief Fund.#CabaretVirale pic.twitter.com/fXFotC6W8h
— CABCricket (@CabCricket) March 25, 2020
४. मुंबई क्रिकेट असोसिएशन-
कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपये देणार आहे.
याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. “मुख्यमंत्री सहाय्यकता निधीला मुंबई क्रिकेट संघटना ५० लाख देणार आहे. या निधीचा वापर कोरोनाविरोधी लढ्यासाठी वापरला जाणार आहे. या कठीण काळात मुंबई क्रिकेट संघटना महाराष्ट्र सरकारला शक्य ती सर्व मदत करणार आहे, ” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Mumbai Cricket Association today decided to donate Rs.50 lakhs to the Chief Minister's Relief Fund towards the fight against Coronavirus. Mumbai Cricket Association will support the Govt. of Maharashtra in any way possible in its fight against this pandemic.
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 26, 2020
३. केरळ क्रिकेट असोसिएशन-
केरळ क्रिकेट असोसिएशनने (Kerala Cricket Association) पंतप्रधान सहाय्यता निधीला ५० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सहसचिव आणि केसीएचे माजी अध्यक्ष श्री. जयेश जॉर्ज (Jayesh George) यावेळी म्हणाले की, “संकटकाळात सरकारला पाठिंबा देण्याची जबाबदारी क्रीडा संघटनांची आहे.”
२. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन-
कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (Karnataka Cricket Association) १ कोटी रुपयांची मदत केली आहे. यामधील ५० लाख रुपये केंद्र सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये देणार आहेत. तर उर्वरित ५० लाख रुपये राज्य शासनाच्या सहाय्यता निधीमध्ये देणार आहेत.
Karnataka State Cricket Association has donated ₹1 Crore (₹50 lakhs each to Central & State Govt.) in fight against Covid 19.
We extend support and appreciate the timely measures taken by both governments in containing the corona virus on a war footing.#StayHomeSaveLives
— Karnataka Ranji Team║ಕರ್ನಾಟಕ ರಣಜಿ ತಂಡ (@RanjiKarnataka) March 30, 2020
१. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राज्य संघटनांच्या मदतीने शनिवारी (28 मार्च) पंतप्रधान सहाय्यता निधीला 51 कोटी रुपयांची मदत झाहीर केली.
NEWS : BCCI to contribute INR 51 crores to Prime Minister @narendramodi ji's Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund
More details here – https://t.co/kw1yVhOO5o pic.twitter.com/RJO2br2BAo
— BCCI (@BCCI) March 28, 2020
याव्यतिरिक्त बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात गरजू व्यक्तींना ५० लाख रुपयांचे तांदुळ वाटण्याचे आश्वासन दिले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पुण्यातच १० हजार वनडे धावा करण्याची सचिनची संधी १९ वर्षांपुर्वी हुकली होती
-या महत्त्वाच्या संघात एमएस धोनीचे स्थान आहे तरी काय?
-टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत १० हजार चेंडू खेळणारे भारतीय फलंदाज